आंतरराष्ट्रीय योग दिन : व्यग्र दिनक्रमातून अशी काढा योगासाठी ४० मिनिटे

योग तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि घरातून काम सुरु झाल्यापासून प्रत्येकाला याची गरज आहे.
yoga
yogagoogle
Updated on

मुंबई : तुमच्या व्यग्र वेळापत्रकातून योगासाठी वेळ काढणे तुम्हाला अवघड जात आहे का ? जर होय, तर तुम्ही तुमचे वेळापत्रक आजपासूनच बनवण्यास सुरुवात करा. शक्य असल्यास प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योगा करा. यामुळे तुम्हाला योगासाठी वेळ काढता येईल.

योग तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि घरातून काम सुरु झाल्यापासून प्रत्येकाला याची गरज आहे. कारण अनेक वेळा एकाच ठिकाणी बसल्यावर खांदे, कंबर आणि पाठ ताठ होते. पाहिले तर अशा वेदनांची तक्रार करणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. योग शरीरातील अनेक रोग दूर करण्याचे काम करते. तुम्हाला नेहमी फिट आणि फ्रेश ठेवते.

yoga
आंतरराष्ट्रीय योग दिन : प्रथमच योगाभ्यास करताय ? मग हे वाचाच....

दररोज ४० मिनिटे योगा करा. जर तुम्ही यापेक्षा जास्त म्हणजे एक तास योग करण्याचे ध्येय ठेवले तर ते तुमच्यासाठी अधिक चांगले आहे, परंतु हळू हळू पुढे जाण्याचा प्रयत्न करा. प्रथम एक आरामदायक पोझ निवडा. यानंतर, हळूहळू तुम्ही सोपे योग निवडू शकता. योगासाठी तुमच्या आजूबाजूला शांत आणि आरामदायी वातावरण निवडा.

आता तुम्ही विचार करत असाल की व्यग्र वेळेत योगासाठी वेळ कसा काढायचा. तुम्ही एकदा योगा क्लास जॉईन केलात तर तुम्हाला जावेच लागेल, कारण अनेकदा जे लोक एकट्याने योगा करायला सुरुवात करतात, त्यांना काही दिवसांनी त्यासाठी वेळ मिळत नाही. ग्रुपमध्ये योगा करण्याचा फायदा असा होतो की तुम्ही नियमितपणे योगासने करू शकाल.

तुम्ही घरीही मुलांसोबत योगा करू शकता, यामुळे तुमच्यासोबतच मुलांमध्येही योगाभ्यासाची आवड निर्माण होईल आणि ते तुमच्यासोबत सुदृढ आणि निरोगी राहतील. मुलांसोबत योगा करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे त्यांच्या वयानुसार योग्य आसने निवडणे. रोज योगासने केल्याने मानसिक आजार, स्पॉन्डिलायटिस, श्वसनाचे आजार, संधिवात, लठ्ठपणा, थायरॉईड, मधुमेह यांसारख्या आजारांपासून तुमचे रक्षण होऊ शकते.

तुम्ही पलंगावरच योगा करू शकता. अशी अनेक आसने आहेत, जी तुम्ही बसून किंवा झोपून आरामात करू शकता. तुम्ही सकाळी उठल्याबरोबर पलंगावर योगा करू शकता, त्याचप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी हलका व्यायाम करू शकता. सकाळी लवकर योगा करण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्ही दिवसाची सुरुवात ताजेपणा आणि उर्जेने करू शकता.

सकाळी शक्य असल्यास रिकाम्या पोटीच योगाभ्यास करा. दिवसाच्या कोणत्याही वेळी योगा करायचा असेल तर लक्षात ठेवा की जेवल्यानंतर तीन तासांनीच करा. त्याचबरोबर कॉफी, चहा, ज्यूस, शेक अशी पेये प्यायली असतील तर अर्ध्या तासानंतरच योगा करा. जर तुम्हाला कोणताही आजार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय योगासने करण्याची चूक करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.