Valentine Day 2024 : 'व्हॅलेंटाईन डे' ला पार्टनरसोबत थायलंडला जा फिरायला, IRCTC घेऊन आलंय कपल पॅकेज

खास 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त IRCTC एक खास टूर पॅकेज घेऊन आले आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बजेटमध्ये थायलंडला फिरायला जाऊ शकता.
Valentine Day 2024
Valentine Day 2024esakal
Updated on

Valentine Day 2024 : अवघ्या काही दिवसांवर ‘व्हॅलेंटाईन डे’ येऊन ठेपला आहे. उद्यापासून ‘रोझ डे’ ने या व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात होणार आहे. व्हॅलेंटाईन डे चा उत्साह तरूणांमध्ये सर्वाधिक असतो.

अनेक जण हा दिवस साजरा करण्यासाठी विविध प्रकारचे प्लॅन्स बनवतात. तुम्ही देखील या दिवशी जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

व्हॅलेंटाईन डे निमित्त IRCTC एक खास टूर पॅकेज घेऊन आले आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बजेटमध्ये थायलंडला फिरायला जाऊ शकता.

या पॅकेजमध्ये तुम्ही थायलंडमधील पट्टाया आणि बॅंकॉकमधील विविध ठिकाणांना भेट देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात IRCTC च्या या कपल स्पेशल ट्रॅव्हल पॅकेजबद्दल.

Valentine Day 2024
Andaman Tour Package : मार्चमध्ये अंदमानला फिरायला जाण्याचा करा प्लॅन, IRCTC घेऊन आलय तगडं पॅकेज

पॅकेजचे नाव - The Treasures of Thailand, Valentine’s Day Special Ex Hyderabad

पॅकेजची तारीख – हे पॅकेज १४ फेब्रुवारीसाठी आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही थायलंड आणि पट्टायाला भेट देऊ शकता.

फ्लाईट कुठून मिळणार

थायलंडला जाण्यासाठी तुम्हाला हैदराबाद या शहरातून फ्लाईट पकडावी लागेल.

पॅकेजचा कालावधी ?

कपल स्पेशल या पॅकेजचा कालावधी ३ रात्री आणि ४ दिवसांचा असणार आहे.

या पॅकेजचा खर्च किती असणार ?

  • व्हॅलेंटाईन स्पेशल पॅकेजसाठी तुम्हाला किमान ४८ हजार ४७० रूपयांचा खर्च येईल. शिवाय, या खर्चामध्ये तुमच्या राहण्याचा, खाण्याचा आणि फ्लाईट तिकिटाचा समावेश असणार आहे.

  • जर तुम्ही दोघे जण (कपल्स) थायलंडला जाणार असाल तर या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला प्रत्येक व्यक्तीच्या मागे ४८ हजार ४७० रूपयांचा खर्च येईल.

  • तुम्ही एकटे देखील थायलंडला जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला ५६ हजार ८४५ रूपयांचा खर्च येईल. त्या खर्चामध्ये फ्लाईटचे तिकीट, खाण्याचा आणि राहण्याचा खर्च समाविष्ट असेल.

  • जर तुम्ही लहान मुलांसोबत या टूर पॅकेजला जाण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी प्रति व्यक्ती ४८ हजार ४७० रूपयांचा खर्च येईल. यासोबत लहान मुलांसाठी बेडसहीत ४५ हजार ५७५ रूपये आणि बेडशिवाय ४१ हजार ५५० रूपये या प्रमाणे खर्च येईल.

  • या टूर पॅकेजच्या बुकिंगसाठी तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. या वेबसाईटवर तुम्हाला या पॅकेजशी निगडीत अधिक माहिती मिळू शकेल.

Valentine Day 2024
Valentine Week : व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यासाठी पुण्याजवळील ही ठिकाणं आहेत बेस्ट, जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.