प्रेसच्या तळाचा भागही खराब होतो आणि तो साफ करण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब करावा लागतो.
आपल्यापैकी बहुतेकांना आणि विशेषतः महिलांना आपले कपडे घरीच प्रसे करायला म्हणजेच इस्त्री करायला आवडते. शक्यतो अनेक महिला घरीच कपडे इस्त्री करतात. घर सांभाळण्याची जबाबदारी खांद्यावर घेतलेली प्रत्येक महिला हे काम करते. या महिला एकाचवेळी अनेक गोष्टी करत असतात. त्यात कपडे इस्त्री करण्याचे कामही अगदी नेटाने आणि वेळात वेळ काढून करतात.
कपड्यांना प्रेस करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. हे काम करत असताना अचानक कुणी आलं तर त्याच्याशी बोलत असताना आपण प्रेस करतो हे महिलांच्या लक्षात येत नाही. यामुळे कपडे जळून खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे सांभाळून हे काम करावे लागते. कारण यात चुकुनही दुर्लक्ष झाले तर कपडे जळून खराब होण्याचा धोका असतो. याशिवाय प्रेसच्या तळाचा भागही खराब होतो. तो साफ करण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब करावा लागतो. समजा जर अशी एखादी घटना घडली आणि प्रेस करताना कपडे जळालेच तर ती इस्त्री साफ करण्यासाठी काही सोपे मार्ग तुम्हाला सांगत आहोत..
कोणत्याही धारदार वस्तूने स्क्रॅप करून तुम्ही प्रेसचा तळ साफ करण्याची चूक करू नका. कारण अनेकजण हॉट प्रेसमधून चिकट काढून टाकण्यासाठी तीक्ष्ण वस्तूचा वापर करतात. असे केल्यास तुमच्या प्रेसची पॉलिश बंद होईल आणि तळ कायमचा खडबडीत होईल. यामुळे भविष्यात मऊ कापड आणि रेशमी कापड इस्त्री करण्यासाठी समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
प्रेस साफ करण्याचा सोपा मार्ग
घरी असलेला एक जुना पांढरा टी-शर्ट घेऊन एक सोपा उपाय करता येतो. तुमच्याकडे टी-शर्ट नसेल तर जुना पांढरा टॉवेलही वापरू शकता.
हा टॉवेल किंवा टी-टॉवेल असावा. मात्र फॅब्रिकचा बनलेला टॉवेल असावा.
हा टॉवेल पसरून त्यावर 2 ते 3 चमचे पांढरे मीठ टाका आणि हे मीठ टॉवेलवर चांगले पसरवा.
आता प्रेस गरम करा आणि या मीठावरून फिरवा.
फक्त एका मिनिटात तुमची प्रेस पूर्णपणे स्वच्छ होईल. आपण नवीन प्रेस विकत घेतल्याप्रमाणे तिचा तळ चमकू लागेल. यासाठी वाफेचा किंवा पाण्याचा वापर करायचीही गरज भासणार नाही. तसेच यासाठी पाणी आणि वाफेचा वापर करु नका.
जेव्हा तुम्ही तुमचे इस्त्री या पद्धतीने स्वच्छ कराल तेव्हा तुमचे पांढरे कपडेही घाण होणार नाहीत.
यामुळे उरलेले डाग तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता, म्हणून येथे पांढरा टी-शर्ट किंवा टॉवेल वापरण्याचा सल्ला दिला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.