Pregnancy diet: प्रेग्नेंसीमध्ये खाताय थंड थंड दही? जाणून घ्या यावर तज्ज्ञांचे मत काय आहे?

गरोदरपणात दही खाणे योग्य आहे का?
Pregnancy
Pregnancy sakal
Updated on

दही हा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे. तज्ज्ञांनी याला आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक प्रकारे फायदेशीर म्हटले आहे. दही हे प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12 चा खूप चांगला स्रोत आहे. पण गरोदर स्त्रिया अनेकदा त्याचा आहारात समावेश करण्यास टाळाटाळ करतात.

अनेकांना असे वाटते की दही खाल्ल्याने बाळाचे नुकसान होऊ शकते. जर तुम्हीही गरोदरपणात दही खाण्याबाबत संभ्रमात असाल तर आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देतो.

गरोदरपणात दही खाणे योग्य आहे का?

गरोदरपणात दही सेवन करणे सुरक्षित आहे का? तर उत्तर होय आहे. कारण जागतिक आरोग्य संघटनेने दही हे गरोदरपणासाठी आरोग्यदायी आहार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची नॅशनल हेल्थ अँड मेडिकल रिसर्च कौन्सिल देखील गर्भवती महिलांना त्यांच्या आहारात रोज दही समाविष्ट करण्याचा सल्ला देते.

त्यामुळे यानुसार गरोदरपणात दह्याचे सेवन केवळ सुरक्षितच नाही तर खूप फायदेशीर देखील आहे. याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.

Pregnancy
Parenting Tips : स्टेजवर गेलं की मुलांची बोबडी वळते? असा निर्माण करा त्यांच्यात Confidence

दही खाण्याचे फायदे

  • दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स म्हणजेच चांगले बॅक्टेरिया शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून संसर्गाशी लढण्यास मदत करतात.

  • गरोदरपणात मूड स्विंग आणि तणाव टाळण्यासाठी दह्याचे सेवन फायदेशीर ठरते. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स मूड सुधारतात आणि चिंता दूर करतात.

Pregnancy
Sleeping After Eating: दुपारी जेवल्यानंतर झोपणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या यावर आयुर्वेदाचे मत काय आहे
  • गरोदरपणात बीपी वाढण्याच्या समस्येमुळे कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. अशा परिस्थितीत दह्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

  • हाडे आणि स्नायू देखील मजबूत होतात. यामध्ये असलेले प्रोटीन आणि कॅल्शियम हाडांना कमकुवत होण्यापासून वाचवते. निरोगी स्नायू तयार करण्यात मदत करते.

  • गर्भधारणेदरम्यान ऍसिडिटी आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही दह्याचे सेवन केले तर ते पचनाशी संबंधित समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.