Anant Radhika Wedding : भावाच्या लग्नात नणंदबाईंची हवा! गळ्यात हिऱ्याचा हार, पिंक-पीच कलरचा लेहेंगा.. ईशा अंबानी दिसतेय राजकुमारी...

ईशाने तिच्या भावाच्या लग्नाच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी राजकुमारीसारखे कपडे घातले आहेत.
isha ambani
isha ambanisakal
Updated on

अखेर 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न झाले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे विधी सुरू झाल्यापासून अंबानी कुटुंबातील सदस्यांचे शाही लूक समोर येत होते. यादरम्यान कधी श्लोकाचा लूक लोकांना आवडला तर कधी ईशाच्या स्टाइलचे कौतुक झाले. काल जेव्हा ईशा तिच्या धाकट्या भावाच्या लग्नाच्या मिरवणुकीसाठी तयार झाली तेव्हा सगळे तिच्याकडे बघतच राहिले. ईशाने तिच्या भावाच्या लग्नाच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी राजकुमारीसारखे कपडे घातले आहेत.

तिच्या भावाच्या खास दिवसासाठी, ईशाने अबू जानी संदीप खोसला यांचा कस्टम पेस्टल पीच लेहेंगा परिधान केला होता. हा लेहेंगा दोन रंगांचा आहे. त्यावर हलका पिवळा आणि गुलाबी-पीच रंग दिसतो. लेहेंग्याला सुंदर आणि हेवी लुक देण्यासाठी त्यावर हाताने जरदोजी एम्ब्रॉयडरी केली आहे, तिने मल्टीकलर स्वीटहार्ट नेकलाइन पॅडेड ब्लाउजसह पेअर केले आहे.

ब्लाउजवरही लेहेंग्यासारखे काम केले आहे. लेहेंगा, चोली आणि दुपट्टा हे सोनेरी आणि स्वारोवस्की क्रिस्टल्सने सजलेले आहेत. दुपट्टाही लेहेंग्यासारखा हेवी बनवला आहे. त्यावर फुलांची डिजाईन आहे जी खरोखरच अप्रतिम दिसते.

isha ambani
Anant-Radhika Wedding : राधिकाचा विषयच लय भारी! लग्नामध्ये परिधान केले बहिणीचे दागिने...

सर्वांच्या नजरा दागिन्यांवर होत्या...

तिचा प्रिन्सेस लूक पूर्ण करण्यासाठी तिने हेवी नेकलेस कॅरी केला आहे. हा डायमंड लूकमध्ये आहे. या दागिन्यांमुळे ईशाच्या लूकमध्ये भर पडली आहे. हेवी डायमंड नेकलेससोबत तिने कानात मॅचिंग झुमके आणि मॅचिंग मांग टिक्का घातला आहे. लुक पूर्ण करण्यासाठी तिने काही मॅचिंग रिंग आणि ब्रेसलेट देखील कॅरी केले होते. तिने तिचा मेकअप सिंपल ठेवला आहे. तिने ब्राऊन-न्यूड मेकअप केला आहे. यासोबत तिने हलक्या रंगाची लिपस्टिक लावली आहे.

Shabda kode:

Related Stories

No stories found.