Janmasthami 2024 : श्री कृष्णांच्या इस्कॉन मंदिराची स्थापना कधी आणि कोणी केली? जगभर पसरलेल्या ISKCON चा उद्देश काय आहे?

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संस्थेस संक्षेपात 'इस्कॉन' म्हणून ओळखले जाते.
Janmasthami 2024
Janmasthami 2024 esakal
Updated on

ISKCON Temple History :

तुम्ही अनेक वेळा इस्कॉन या मंदिरांविषयी ऐकले असेल. इस्कॉन हे परदेशातील नव्हे तर जगभरातील श्री कृष्णांच्या मंदिरांचे नाव आहे. कोल्हापूर,सांगली,पंढरपूर,पुणे अशा अनेक जिल्ह्यात नव्हेतर संपूर्ण जगभर ही मंदिरे उभारण्यात आली आहेत.

जगभर 'इस्कॉन'ला 'हरे कृष्ण' संस्था या नावाने ओळखते. काही लोक ही एखादी विदेशी संस्था, तर काहीजण याला ५० वर्षांपूर्वी सुरू झालेली आणखी एक धार्मिक संस्था म्हणून ओळखतात. इस्कॉनचे नाव निघताच अनेकांच्या मनात रस्त्यातून संकीर्तनाच्या वेळी नाचत गात जाणाऱ्या भक्तांच्या समूह येतात.

Janmasthami 2024
Janmasthami 2024 : कान्हा,कन्हैय्या नाहीतर बाळासाठी निवडा श्री कृष्णांची ही ट्रेंडी नावे, बाळाचंं नशिब उजळवतील ही नावं

५०० वर्षांपूर्वी श्री चैतन्य महाप्रभू या जगात अवतीर्ण झाले. त्यांनी आत्मसाक्षात्काराची सगळ्यांत सोपी पद्धत शिकविली आहे,

'हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे' ।।

या महामंत्राचे कीर्तन. हे हरिनाम संकीर्तन आता केवळ भारत देशातच मर्यादित राहिलेले नाही तर ते श्री चैतन्य महाप्रभूच्या भविष्यवाणीप्रमाणे सर्व जगात पसरले आहे.

या नामसंकीर्तनाच्या प्रचार-प्रसारासाठी परमपूज्य श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपादांनी भगवान श्री चैतन्य महाप्रभूच्या शिकवणुकीच्या आधारावर १९६६ साली न्यूयॉर्क येथे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाची स्थापना केली. रोज अधिकाधिक लोक श्रीकृष्ण भावनेमध्ये रुची घेत आहेत.

न्यूयॉर्कमधील इस्कॉन मंदिर
न्यूयॉर्कमधील इस्कॉन मंदिरesakal
Janmasthami 2024
ISKCON Chandan Yatra : इस्कॉन मंदिरात चंदन यात्रेचा उत्साह! दर्शनासाठी भाविकांची गर्दी

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संस्थेस संक्षेपात 'इस्कॉन' म्हणून ओळखले जाते. इस्कॉनची विश्वभर अनेक मंदिरे, आश्रम, कृषिसंघटना, गुरुकुले, गोशाळा आणि विद्यापीठे आहेत. आज जगाच्या प्रत्येक खंडात, कानाकोपऱ्यात इस्कॉनची ५०० हून अधिक मंदिरे आहेत.

जगभरातील लोक आज कृष्णभावनेचा स्वीकार करीत आहेत. जगातील विभिन्न देशांतील, विभिन्न लोक ज्यांनी कधी पूर्वी 'कृष्ण' हा शब्द ऐकलेलाही नाही, असे लोक आज कृष्णाचे प्रेमळ भक्त बनून स्वतः कृष्णभावनेचा प्रचार, प्रसार सर्वत्र करीत आहेत.

श्री चैतन्य महाप्रभूच्या शिष्यपरंपरेद्वारे प्राप्त झालेल्या भगवद्‌गीतेच्या व श्रीमद्भागवताच्या अनादी शिकवणुकीवर इस्कॉन संस्था आधारलेली आहे. श्री चैतन्य महाप्रभूनी कृष्णभक्तीचे विज्ञान शिकविले, जगभर कृष्णभावनेचा प्रचार करून चैतन्य महाप्रभूचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाची स्थापना झाली.

Janmasthami 2024
Nashik ISKCON Temple : भगवान श्रीकृष्णाला 1008 पदार्थांचा नैवेद्य; 25 हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
पुण्यातील इस्कॉन मंदिर
पुण्यातील इस्कॉन मंदिरesakal

इस्कॉन संस्था ही गौडीय संप्रदायाचेच अंग आहे. ही परंपरा श्रील प्रभुपादांच्या द्वारा आणि पूर्वाचार्यांमार्फत श्री चैतन्य महाप्रभू, मध्वाचार्य, ब्रह्मदेव आणि शेवटी श्रीकृष्णापर्यंत जोडलेली आहे. ही अतूट शिष्य परंपरा हे इस्कॉनच्या प्राचीनतेचे एक मुख्य प्रमाण आहे. ब्रह्म-मध्व-गौडीय वैष्णव संप्रदायाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाची शिकवण आहे.

श्रीकृष्णभावनेत परिपूर्णता मिळविण्यासाठी पोषक वातावरणात भक्तांना सत्संग मिळावा यासाठी श्रील प्रभुपादांनी इस्कॉन संस्थेची स्थापना केली. इस्कॉनच्या तत्त्वांना स्वीकारून मनुष्य कृष्णभावनेत पूर्णता मिळवू शकतो.

Janmasthami 2024
Nashik ISKCON Temple : इस्कॉन मंदिरात 300 किलो द्राक्षांची सजावट
सांगलीतील इस्कॉन मंदिर
सांगलीतील इस्कॉन मंदिरesakal

'परस्पर साहाय्याने माझ्या शिष्यांनी कृष्णभावनेचा प्रचार करावा' असा श्रील प्रभुपादांचा आदेश आहे आणि हा आदेशच ह्या संस्थेच्या वाढत्या विस्तारामागील प्रेरणा आहे.

जेव्हा इस्कॉनमध्ये भक्तगण 'श्रील प्रभुपाद' असे म्हणतात, ते परमपूज्य श्रील ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांना उद्देशून म्हणतात. ते या संस्थेचे संस्थापकाचार्य आहेत. जगाच्या धार्मिक इतिहासात त्यांचे वेगळे असे स्थान आहे.

(संबंधित माहिती भूवैकुण्ठ पंढरपूर या लोकनाथ स्वामी रचित पुस्तकातून घेण्यात आली आहे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.