Jalebi History: भारतात जिलेबी आली कशी अन् नाव कसे पडले? राहुल गांधींच्या वक्तव्यावरून चर्चेत आलेल्या जिलेबीचा इतिहास काय?

How did jalebi come to India, Know how did it get its name: हरियाना विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने विजयाची हॅट्रिक केली आहे. या मोठ्या विजयानंतर राहुल गांधी यांच्या सरकारी बंगल्यावर जिलेबीचा बॉक्स पाठवण्यात आला आहे. तसेच त्यांच्या वक्तव्यावरून जिलेबी चर्चेचा विषय ठरला आहे. यानिमित्याने भारतात जिलेबी कशी आली आणि नाव कसे पडले हे जाणून घेऊया.
Jalebi History:
Jalebi History:Sakal
Updated on

Jalebi History: हरियानातील गोहाना येथे रॅलीच्यावेळी एका स्थानिक मिठाई दुकानातील जिलेबीबद्दल राहुल गांधी यांचे एक वक्तव्य चांगलेच व्हायरल झाले होते. हरियाना विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने विजयाची हॅट्रिक केली आहे. या मोठ्या विजयानंतर राहुल गांधी यांच्या सरकारी बंगल्यावर जिलेबीचा बॉक्स पाठवण्यात आला आहे. तसेच त्यांच्या वक्तव्यावरून जिलेबी चर्चेचा विषय ठरला आहे. यानिमित्याने भारतात जिलेबी कशी आली आणि नाव कसे पडले हे जाणून घेऊया.

भारतात जिलेबी आली कशी?

जरी जिलेबी इरानमधून आली असली तरी भारतात या पदार्थाला राष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे. उत्तर आणि दक्षिण भारतात जिलेबी आणि नॉर्थ इस्टमध्ये जिलापी म्हटले जाते. तर इरानमध्ये जुलबिया नावाने ओळखली जाते. रमजान महिन्यात हा गोड पदार्थ खाण्यीच परंपरा आहे. मध्य पूर्वेकडील देशांमध्ये जिलेबी बनवताना मध आणि गुलाबजलचा वापर केला जातो.

आता जिलेबी भारतात कशी आली हे सोप्या शब्दात समजून घेऊया. इरानच्या जुलबियाचा उल्लेख 10 व्या शतकाच्या सुरूवातीस आहे. मुहम्मद बिन हसन अल-बगदादी यांच्या 'अल-ताबीख' या प्राचीन इरान कूकबुकमध्ये या डिशच्या पाककृतीचा उल्लेख आहे. पुस्तकात म्हटले आहे की, रमजान आणि इतर सणांमध्ये 'जिलेबी' हा गोड पदार्थ ही पारंपारिकपणे लोकांमध्ये वाटली जाणारी मिठाई आहे. या जिलेबीचा उल्लेख इब्न सय्यर अल-वाराक यांच्या १०व्या शतकातील अरबी पाकशास्त्राच्या पुस्तकातही आहे.

Jalebi History:
Navratri Fast Recipe: नवरात्रीत सकाळी आरोग्यदायी नाश्ता करायचा असेल तर बनवा स्वादिष्ट 'पनीर खीर', नोट करा रेसिपी

जुलबिया आज इराणमध्ये लोकप्रिय आहे. पण भारतीय जिलेबीपेक्षा वेगळी आहे. कारण दोघांच्या बनवण्यामध्ये थोडा फरक आहे. मध्यपूर्वेतील देशांमध्ये जिलेबी बनवताना मध आणि गुलाबजलचा वापर केला जातो. पण भारतात साध्या साखरेचा पाक वापरला जातो.

इतिहासकार सांगतात की जिलेबी मध्ययुगीन काळात व्यापारी, कारागीर आणि मध्य-पूर्व आक्रमकांच्या माध्यमातून भारतात पोहोचली. अशा प्रकारे जिलेबी बनवण्याची प्रक्रिया भारतात आली आणि ती तयार करण्याचा ट्रेंड येथे सुरू झाला. 15 व्या शतकाच्या शेवटी भारतात साजरे होणारे सण, लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये जिलेबीचा प्रवेश झाला. एवढेच नाही तर मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून वाटप करण्यास सुरूवात झाली.

जिलेबी हे नाव कसं पडलं?

इंडियन फूड: ए हिस्टोरिकल कंपेनियन या पुस्तकात, फूड हिस्टोरियन केटी आचार्य यांनी लिहिले की – “हॉब्सन-जॉब्सनच्या मते, जिलेबी हा शब्द 'अरबी झलाबिया किंवा इरान झालिबियाचा अपभ्रंश' आहे.

भारतात जिलेबीचा आस्वाद अनेक पदार्थांसोबत घेतला जातो. उत्तर भारतात दह्यासोबत तर मध्य भारतात पोह्यासोबत खाण्याची परंपरा आहे. गुजरातमध्ये जिलेबी फाफडासोबत खाल्ली जाते. देशाच्या अनेक भागांमध्ये जिलेबी रबडीत भिजवून खाल्ली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.