Janmashtami 2023 : राधा-कृष्णाच्या प्रेमाची अतूट खूण विठ्ठलाच्या आरतीतही आहे, कसं ते पहा

विठ्ठलाची पत्नी तर रूक्मिणी पण हे 'राही' काय आहे?
Janmashtami 2023
Janmashtami 2023 esakal
Updated on

Janmashtami 2023 : जेव्हा जेव्हा प्रेमाचा उल्लेख होतो. तेव्हा प्रथम भगवान श्रीकृष्णाचे नाव येते. श्रीकृष्ण हे प्रेम आणि स्नेहाचे प्रतीक मानले जातात. पुराणानुसार श्रीकृष्णाला 16 हजार 108 राण्या होत्या. श्रीकृष्णाच्या मुख्य राण्यांमध्ये रुक्मणी, सत्यभामा या नावांचा समावेश आहे.

याशिवाय श्रीकृष्णाच्या बालपणी गोकुळातील गोपींसोबतच्या रासलीलेच्या कथा आजही प्रसिद्ध आहेत. मात्र, सर्वांना प्रेमाचा आणि आपुलकीचा धडा शिकवणाऱ्या श्रीकृष्णाची पत्नी रूक्मिणी असली तरी त्यांचे नाव राधेशिवाय अपूर्णच वाटते. भगवान श्रीकृष्णाचे नामस्मरण करताना प्रत्येकजण 'राधे श्याम'चा जप करतो.

श्रीकृष्णांना अनेक राण्या असल्या तरी राधेच प्रेम जरा वरचढच आहे. इतक्या राण्या होत्या तरी श्रीकृष्णांनी राधेशी विवाह केला नाही, असे का? राधा कोण होती आणि तिच्याशी विवाह झाला नाही तरी देखील राधेचे नाव त्यांच्याशी कसे जोडले गेले. याची आज उत्तरे पाहुयात.

Janmashtami 2023
Janmashtami 2023 : जन्माष्टमीदिवशी दही-पोहे खाण्याला का आहे महत्त्व? जाणून घ्या रेसिपी

राधा कोण होती?

पद्मपुराणानुसार राधा ही वृषभानु नावाच्या गोपाळाची मुलगी होती. काहींच्या मते राधेचा जन्म यमुना नदीकाठी वसलेल्या रावळ गावात झाला. पुढे त्याचे वडील बरसाना येथे येऊन स्थायिक झाले. काही लोकांचा असा विश्वास आहे की राधेचा जन्म फक्त बरसाना येथे झाला होता.

बरसानामध्ये राधाजींना प्रेमळ माता म्हटले जाते. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार राधा ही कृष्णापेक्षा चार वर्षांनी मोठी होती आणि त्यांची मैत्रीण होती. राधाशी संबंधित इतरही अनेक समजुती आहेत. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार राधाचा विवाह रायना नावाच्या पुरुषाशी झाला होता, जो आई यशोदेचा भाऊ होता. म्हणजे राधा ही कृष्णाची मामी असल्यासारखी वाटत होती. असा उल्लेख इतर पुराणांत आढळत नाही.

Janmashtami 2023
Janmashtami Festivity : जन्माष्टमीसाठी कान्हा ड्रेस, प्रिंटेट धोतरची क्रेझ

राधा कृष्णापेक्षा पाच वर्षांनी मोठी होती. कृष्णाने घरी येऊन आई यशोदाला सांगितले की त्याला राधाशी लग्न करायचे आहे. त्यावेळी यशोदा मातेच्या सांगण्यावरून नंद महाराज आपल्या मुलाला घेऊन गर्गाचार्य आणि संदीपनी ऋषींच्या आश्रमात गेले. येथे संदीपनी ऋषींनी कृष्णाला त्यांच्या जन्माचे सत्य सांगितले.

गुरूंचे सांगणे ऐकूण कृष्णाने विनम्रतेने सांगितले, गुरूदेव माझे मन गाय, पर्वत, जंगल यांच्यातच रमते. मला यांच्यातच रहायचे आहे.त्यानंतर कृष्णांनी त्यांचे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न केले. आयुष्यातून राधा निघून गेली तरी तिचे नाव मात्र देवांसोबतच राहीले. हेच त्यांचे प्रेम अजरामर झाले.

Janmashtami 2023
Janmashtami 2023 : कोल्हापुरात या ठिकाणी आहेत श्रीकृष्णांच्या पायांचे ठसे, पाठोपाठ गायीच्या पायांनाही आहे महत्त्वाचे स्थान

आता पाहुयात विठ्ठलाच्या आरतीमध्ये राधेचे नाव कसे आहे ते?

विठोबाची आरती

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।

वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।

चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ।

रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।। जय देव जय देव ।। धृ० ।।

तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी ।

कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।

देव सुरवर नित्य येती भेटी ।

गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ।। २ ।।

धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा ।

सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।

राई रखुमाबाई राणीया सकळा ।

ओवाळिती राजा विठोबा सावळा ।। ३ ।।

ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती ।

चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।

दिंड्या पताका वैष्णव नाचती ।

पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। ४ ।।

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।

चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती ।

दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति ।

केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।।  (Vitthal Rakhumai)

Janmashtami 2023
Janmashtami 2023 : कन्हैय्या, मुरली की अनिष; जन्माष्टमीला जन्मलेल्या बांळासाठी कृष्णांची खास नावे एकदा पहाच!  

या आरतीमध्ये रखुमाई, रुक्मिणी म्हणजे विठ्ठलाची पत्नी हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. रखमाई वल्लभा म्हणजे रखुमाईचा पती पण मग राईच्या वल्लभा का म्हणतात?

राहीच्या वल्लभा असा मूळ शब्द आहे. राही म्हणजे राधा. विठ्ठल हा विष्णुचा अवतार मानला जातो. विष्णुच्या कृष्ण अवतारामध्ये रुक्मिणी कृष्णाची पत्नी होती. तर राधा त्याची प्रेयसी मानली जाते.

 यावरुन रुक्मिणी कृष्णावर रागावली होती, अशी कथाही आढळते. विठ्ठल हा कृष्णाचा पुढचा अवतार, असंही दशावतारामध्ये सांगितलं आहे. त्यामुळेच विठ्ठलाच्या आरतीमध्ये रखुमाईसोबत राई, राहीचाही उल्लेख आढळतो. याशिवाय राईच्या वल्लभा म्हणजे पृथ्वीच्या वल्लभा असा अर्थ असल्याच्याही चर्चा आहेत. (Janmashtami)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.