Janmashtami Jhula Decoration Ideas 2024: अवघ्या तिन दिवसांवर गोकुळाष्टमीचा सण येऊन ठेपला आहे. यंदा २६ ऑगस्टला हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची मनोभावे पूजा केल्यास सर्व समस्या दूर होतात अशी मान्यता आहे. देशभरात गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो.
गोकुळाष्टमीची तयारी अनेक घरांमध्ये सुरू झाली आहे. या दिवशी कृष्णाचा अभिषेक करून सजावट केली जाते. प्रत्येकाच्याच घरी लड्डूगोपाल म्हणजेच बाळकृष्णाची लहान मूर्ती असते. कृष्ण जन्माष्टमीसाठी बाजारात अनेक रेडिमेट पाळणे, सजावटीचे साहित्य, मुकूट मिळतात. पण घरी स्वत: पाळणा सजवण्याचा आनंद जास्त असतो. तुम्ही यंदा पुढील गोष्टींचा वापर करून श्रीकृष्णाच्या पाळण्याची सुंदर सजावट करू शकता.