आपल्या भारतात श्रीकृष्णांची अनेक मंदिर आहेत. ज्या मंदिरांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. जसे कृष्णाच्या एका मंदिरात भगवंताच्या हातात एक घड्याळ आहे. तर दुसरीकडे एका मंदिरात श्रीकृष्ण रुक्मिणी सोबत विराजमान आहेत. भारतात आणखी एक कृष्णाचे मंदिर आहे जे आपल्याला थोडे बुचकळ्यात टाकणारे आहेत.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात जाताना पुजाऱ्यांना हातोडा घेऊन जावा लागतो. भारताची देवभूमी असलेल्या केरळमध्ये श्रीकृष्णांचे हे अद्भुत मंदिर आहे. या मंदिराच्या दरवाजे उघडण्यासाठी तिथल्या पुजारांना हातोड्या सोबत न्यावा लागतो. पण ते असं का करतात. त्यांना सकाळच्या वेळी हातोड्याची गरज का पडते याची उत्तरे जाणून घेऊया.
दक्षिण भारतात केरळमधील पोटायम जिल्ह्यात तिरुवेरपू इथे हे मंदिर आहे. या मंदिराचे नाव तीरवप्रभू श्रीकृष्ण स्वामी मंदिर असे आहे. अनेक रहस्यांनी भरलेले असे हे मंदिर आहे. या मंदिराची प्राचीनता पाहून असं म्हटलं जातं की अनेक साम्राज्याचे राजे इथे दर्शनाला येत होते. कारण हे मंदिर 1500 वर्षांहून अधिक काळ प्राचीन आहे.
या मंदिराचा आहे महाभारताशी संबंध
स्थानिक लोकांचे असे मत आहे की वनवासात असताना पांडवांनी या मूर्तीची पूजा केली होती. वनवास संपताना पांडवांनी ही मूर्ती तिथल्या मासेमाऱ्यांना दिली. काही वर्षांनी मासेमाऱ्यांवरती अनेक वेळा संकट आली. आपल्यावर सतत येणाऱ्या संकटांमुळे यावर उपाय शोधायचा ठरवले. त्यांनी तिथून जाणाऱ्या साधूंना ही समस्या सांगितली.
तेव्हा साधू म्हणाले की, तुम्ही सांभाळत असलेली मूर्ती अद्भुत आणि देवाचा अंश असलेली आहे. पण तिचे देवपण जपणे सोपे नाही. तुम्हाला संकटांचा सामना करावा लागत आहे. तो कमी करायचा असेल तर ही मूर्ती तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करा.
मासेमाऱ्यांनी ती मूर्ती विसर्जित केली. त्यानंतर काही वर्षांनी विल मंगलम स्वामीयर नावाचा एक व्यक्ती गावच्या होडीतून कुठेतरी जात होता. तेव्हा त्याचे होडी कशात तरी अडकली. स्वामी यांनी पाण्यात उतरून होडी सोडवण्याचा प्रयत्न केला. पण ते कठीण होते. जेव्हा स्वामीयर यांचा हात मूर्ति याला लागला तेव्हा नदीचे पाणी आपोआप कमी झाले आणि पाण्यातली मूर्ती स्पष्ट दिसू लागली.
तो व्यक्ती ही मूर्ती घेऊन तिरुवरप्पू गावी पोहोचला. त्यांनी मूर्ती एका ठिकाणी ठेवली आणि स्वतः आंघोळ करण्यासाठी गेले. आंघोळ करून त्या मूर्तीची प्रतिष्ठापणा कुठे करायची हा विचार करत होते. बाहेर येऊन त्यांनी ती मूर्ती उचलण्याचा प्रयत्न केला. ती मूर्ती तिथून हलली नाही. ही गोष्ट गावात पसरली आणि गावकऱ्यांनी हा कृष्णाचा चमत्कार समजून ती मूर्ती तिथेच ठेवली आणि तिथे एक मोठं मंदिर उभारलं.
स्थानिक लोक सांतात की श्रीकृष्णाला भूक आवरत नाही. जर या मूर्तीला नैवेद्य दाखवण्यास उशीर झाला तर ही मूर्ती बारीक होऊ लागते. त्यामुळे दिवसातून दहा वेळा या मूर्तीला नैवेद्य दिला जातो.
एकदा ग्रहण काळात मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्यात आले होते. ग्रहण संपेपर्यंत देवांना नैवेद्य दाखवला गेला नाही. जेव्हा पुजाऱ्यांनी मंदिराच्या दरवाजे उघडले आणि देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गेले तेव्हा मंदिरातील मूर्तीला घातलेले धोतर खाली सरकले होते म्हणजेच देवांची मूर्ती आकुंचन पावली होती. त्यामुळे या मंदिरातील कृष्णाला दिवसातून दहा वेळा नैवेद्य दाखवला जातो.
दिवसभरात हे मंदिर केवळ २ मिनिटांसाठी बंद केले जाते. दिवसभरात रात्री ११ वाजून ५८ मिनिटांनी हे मंदिर बंद होते. तर १२ वाजता पुन्हा उघडते. श्री कृष्णांना नैवेद्य दाखवत असताना दरवाजे बंद झाले तर ते तोडण्याची परवानगी पुजाऱ्यांना आहे. त्यामुळेच, ते सोबत हातोडा घेऊन जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.