Janmashtami 2024 : श्री कृष्णासाठी नैवेद्य म्हणून लागतो सुंठवडा, पण तो कसा बनवायचा माहितीय का?

सर्व भक्त भगवान कृष्णांची विशेष सजावट करून त्यांना सुंठवड्याचा नैवेद्य दाखवला जातो. प्रसादातील सुंठवडा खाण्याचे अनेक फायदे आहेत.
Janmashtami 2024
Janmashtami 2024 esakal
Updated on

Janmashtami 2024 :

भगवान श्री कृष्णांचा आज जन्मोत्सव आहे. आज रात्री बारा वाजता श्री कृष्णांचा जन्मकाळ साजरा होणार आहे. भगवान विष्णूचा आठवा अवतार श्री कृष्ण यांचा जन्मदिवस जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विधीनुसार भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याबरोबरच उपवास करण्याची परंपरा आहे.

असे मानले जाते की वाढदिवसाच्या दिवशी व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होते. याशिवाय जीवनात सुख-समृद्धी टिकून राहते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते. त्यानंतर मध्यरात्री 12 वाजल्यानंतर कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो.

Janmashtami 2024
Janmashtami 2024 : श्री कृष्णांची द्वारका पाण्यात कशी बुडाली ? उत्खननात नक्की काय-काय सापडलं?

यावेळी, सर्व भक्त भगवान कृष्णांची विशेष सजावट करून त्यांना सुंठवड्याचा नैवेद्य दाखवला जातो. प्रसादातील सुंठवडा खाण्याचे अनेक फायदे आहेत. हा कसा बनवायचा हे पाहुयात.  

साहीत्य -

बडिशेप : एक चमचा

तीळ : एक चमचा

साखर : दोन चमचे

खडीसाखर : दोन चमचे

सूंठ : दोन चमचे

वेलची : दोन ते तीन

मणुके : एक चमचा

किसलेले सुके खोबरे : अर्धा कप 

Janmashtami 2024
Janmashtami Special Look : तमन्ना भाटियाचा राधाराणी लूक व्हायरल.! तुम्हीही घेऊ शकता तिच्या लूकवरून ‘या’ सोप्या टिप्स

कसा तयार करावा सुंठवडा ?

  • गॅसवर एक पॅन गरम करत ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर खारीकाचे काप, काजू आणि बदाम भाजून घ्या आणि एका प्लॅटमध्ये काढा. 

  • यानंतर ओवा, बडिशेप, खसखस आणि तीळ एकत्रित भाजून घ्या व यानंतर प्लॅटमध्ये काढून घ्यावेत. 

  • यानंतर मनुका, सुके खोबरेही गॅसच्या मंद आचेवर भाजून घ्यावे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.