Janmashtami 2024 : जन्माष्टमीसाठी मुलांना असं करा तयार, सर्वांना त्याच्यात होईल बाळकृष्णाचा भास

शाळेतील बालचमूंना श्रीकृष्णासारखे सजवण्यासाठी या गोष्टी नक्की कामी येतील
Janmashtami 2024
Janmashtami 2024esakal
Updated on

Janmashtami 2024 :

 नंद गोपाळांचा जन्माष्टमीचा हा आवडता सण आहे. बाळगोपाळांच्या मेळ्यात रमलेल्या गोविंदाला पाहणं वेगळीच अनुभूती देणारं ठरतं. बाळ गोपाळांचा आवडता देव श्रीकृष्णाचा हा जन्मदिवस आहे. यादिवशी मोठ्या प्रमाणात जन्मोत्सव साजरा करून दहीहीडीचे नियोजन केले जाते.

जन्माष्टमी सर्वत्र साजरी केली जाते. तशी ती शाळेतही साजरी केली जाते. शाळेतील बालचमूंना श्रीकृष्णासारखे सजवले जाते. त्यासाठी खास ड्रेपरी आणली जाते. दागिने, पारंपरिक धोती कुर्ता घालू शकता. तुम्हालाही मुलांना तयार करताना काही अडचणी येत असतील तर या टिप्स तुमच्या कामी येतील. (Janmashtami 2024)

Janmashtami 2024
Janmashtami 2024 : यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे ? जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् पूजेची पद्धत

ड्रेस

ज्या घरात बाळ असते त्याला सुरूवातीपासूनच कृष्णा म्हटले जाते. श्री कृष्णाचे बालरूप प्रत्येकाला आवडते. त्यामुळेच लहान मुलांना टिकली-पावडर लावून नटवले जाते. कृष्णाच्या लुकसाठी लहान मुलांना धोती आणि कुर्ता घाला. किंवा धोती घालून त्यावर फक्त शेला घातला तरी चांगला दिसेल.

दागिने 

बाळाला श्री कृष्ण बनवताना तुम्ही काही दागिनेही घालू शकता. यासाठी मोत्याचे, आर्टीफिशिअल फुलांचे दागिने उठून दिसतात. मोती, फुलांचे अन् सोन्यासारखे दिसणारे दागिनेही उठून दिसतात. गळ्यात हार, फुलांचेच बाजूबंद यांचा वापर करा.

Janmashtami 2024
Janmashtami Festivity : जन्माष्टमीसाठी कान्हा ड्रेस, प्रिंटेट धोतरची क्रेझ

मुकूट

आजकाल बाजारात सोनेरी रंगात असलेले देवांसारखे मुकूट उपलब्ध आहेत. तुम्ही बाळाला फुलांचा मुकूट बनवू शकता. तसेच, तुम्ही ड्रेपरी सेट विकत घेतला किंवा भाड्याने घेतला तर त्यातील मुकूट हवा तसा चांगला दिसत नाही. त्यामुळे, तुम्ही काही फुलं आणि रंगीत ओढण्यांपासून मुकूट बनवू शकता.

Janmashtami 2024
Krishna Flood Update: सीमाभागातील तीन गावांचे होणार कायमस्वरूपी स्थलांतर! पूरस्थितीची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

मोजडीने खुलते सौंदर्य

श्री कृष्णाचा पारंपरिक लुक केल्यावर त्यावर साधे चप्पल किंवा शूज चांगले दिसणार नाहीत. त्यामुळे, बाळाच्या पायाच वर्क असलेली मोजडी घाला. जी तुमच्या बाळाचा श्रीकृष्णांचा लुक परिपूर्ण करेल.

बासरी

भगवान शंकरांचा लुक केल्यावर जसे त्रिशूळ अन् डमरू असते. तसे, श्री कृष्ण सुद्धा बासरी शिवाय अपूर्ण आहेत. त्यामुळे, बाळाचा लुक पूर्ण करण्यासाठी तुम्ही बाळाच्या हातात एक बासरी द्या. या बासरीला तुम्ही एक काठी घेउन त्याला रगीत कागद चिटकवून घरीही बनवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.