Janmashtami 2024 : श्री कृष्ण जन्माष्टमी दिवशी या चूका करणं टाळा, नाही तर भोगावे लागतील वाईट परिणाम

Don't Do This Mistake In Krishna Janmashtami :आपण जन्माष्टमीच्या पवित्र दिवशी केलेला चुका आपल्या भविष्यावरती परिणामकारक ठरतात. त्याचे बरे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात.
Janmashtami 2024
Janmashtami 2024 esakal
Updated on

Shri Krishna Janmashtami :

श्रावण महिन्यात येणारा एक महत्त्वाचा सण म्हणजे गोपाळकाला. या सणाला जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, दहीहंडी असे देखील म्हणतात. हा सण जितका महिलांच्या आवडतीचा आहे तितकाच तो पुरुषांना सुद्धा आवडतो. जन्माष्टमीच्या पहिल्या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. तर दुसऱ्या दिवशी दहीहंडी याचं नियोजन केले जाते.

जन्माष्टमी दोन दिवस साजरी केली जाते. श्रीकृष्णांचा जन्म रात्री बारा वाजताचा झालेला आहे. दोन दिवस हा सण साजरा केला जातो. कृष्ण जन्माष्टमी दिवशी श्रीकृष्णाची पूजा केली जाते आणि उपवासही केला जातो. काही घरांमध्येही श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा केला जातो.(Don't Do This Mistake In Krishna Janmashtami)

Janmashtami 2024
Janmashtami 2024 : राधा ही बावरी! जन्माष्टमीसाठी मुलींना असं बनवा राधा, सर्वत्र होईल कौतुक

या दिवशी घरात प्रसन्न वातावरण असते. लोक उपवास करतात देवाच्या नामस्मरणात दिवस घालवतात. पण या दिवशी आपण काही गोष्टी टाळणे गरजेचे असते. कारण आपण जन्माष्टमीच्या पवित्र दिवशी केलेला चुका आपल्या भविष्यावरती परिणामकारक ठरतात. त्याचे बरे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. त्यामुळे जन्माष्टमी दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात याची माहिती घेऊयात.

Janmashtami 2024
Janmashtami 2024 : श्रीकृष्णाच्या या अनोख्या मंदिरात दररोज केली जाते विधीपूर्वक पूजा, पण माचिसचा वापर आहे वर्ज्य, असे का?

जन्माष्टमीचा मुहूर्त काय आहे

वैदिक पंचांगानुसार, श्रीकृष्ण जन्माष्टमी तिथीची सुरूवात रविवार २५ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३ वाजून ३९ मिनिटांनी सुरू होईल. त्याचवेळी सोमवारी २६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २ वाजून १९ मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल.

त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये उदय तिथीनुसार २६ ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी सर्वत्र साजरी केली जाईल. जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त हा सकाळी १२:०१ पासून ते १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे, या कालावधीमध्ये तुम्ही श्रीकृष्णाची पूजा करू शकता.

Janmashtami 2024
Janmashtami 2024: गोकुळाष्टमीला श्रीकृष्णाचा 'अशा' पद्धतीने सजवा पाळणा, सर्वजण पाहतच राहील

जन्माष्टमीदिवशी या चूका करू नका

जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव आहे. देशभर नाही तर जगभर तो साजरा केला जातो. जगभरात पसरलेल्या इस्कॉन या मंदिरात श्रीकृष्णांचा जन्मोत्सव धुमधडाका साजरा होतो. आणि घरातही लोक व्रत करून उपवासाचे पदार्थ खातात.

जरी तुम्ही या दिवशी उपवास केला नसेल तरी एक गोष्ट मात्र पाळा ती म्हणजे या दिवशी तामसिक अन्न खाऊ नका. मांस, मटन, अंडी असे पदार्थ खाणे टाळा. तसेच धूम्रपान मध्यपानेही करू नका.

Janmashtami 2024
Janmashtami Travel Tips: वीकेंडला तीन दिवस सुट्ट्या! पुण्याजवळच्या 'या' हिल स्टेशनची करा सैर, आनंद होईल द्विगुणित

या दिवशी मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका

भगवान श्रीकृष्ण लहानपणापासूनच गोपाळांमध्ये राहिलेले आहेत. श्रीकृष्ण गायी सांभाळायचे ते गायींचे संरक्षण करायचे. भगवंताला मुके प्राणी आवडतात. ते नेहमी गायीच्या सहवासात असायचे. त्यामुळे या दिवशी मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका. असं केल्याने श्रीकृष्ण तुमच्यावरती नाराज होऊ शकतात. (Shri Krishna Janmastami)

Janmashtami 2024
Janmashtami Festivity : जन्माष्टमीसाठी कान्हा ड्रेस, प्रिंटेट धोतरची क्रेझ

या रंगाची वस्त्रे परधान करणे टाळा

जन्माष्टमीचा उत्सव असो किंवा वर्षभरातील इतर सणसमारंभ कोणत्या रंगाचे कपडे घ्यायचे हे आपलं ठरलेलं असतं. तसेच शुभ दिनी चांगले शुभ रंगाचे कपडे घातले जातात. जन्माष्टमी दिवशी तुम्ही चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका. कारण काळा रंग हा दानवांचे प्रतीक आहे. तो वाईट गोष्टींचेही प्रतिनिधित्व करतो. जर तुम्ही खरे कृष्ण भक्त असाल तर या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नका.  

Janmashtami 2024
Janmasthami 2024 : श्री कृष्णांच्या इस्कॉन मंदिराची स्थापना कधी आणि कोणी केली? जगभर पसरलेल्या ISKCON चा उद्देश काय आहे?

या दिवशी तुळशीची पाने तोडू नका

भगवान श्रीकृष्ण हे विष्णूचा अवतार मानले जातात. भगवान विष्णूंना तुळशी प्रिय आहे. तसेच श्रीकृष्णालाही तुलसी प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी तुळशीची पाने तोडू नका. प्रत्येक पूजेत तुम्हाला तुळशीची पाने वापरण्यास सांगितले जाते. मात्र जन्माष्टमीदिवशी तुळशीची पाने तोडू नका. कारण, यामुळे कृष्ण भगवान नाराज होऊ शकतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.