'संगोपनात नाही तडजोड'

मला आईपणाची चाहूल लागली, तेव्हा मी ‘प्रेम नाम है मेरा प्रेम चोपडा’ या नाटकात संजय मोने आणि जितेंद्र जोशी यांच्यासोबत काम करत होते.
Journey of an Actress into Motherhood
Journey of an Actress into Motherhood sakal
Updated on

श्‍वेता शिंदे

मला आईपणाची चाहूल लागली, तेव्हा मी ‘प्रेम नाम है मेरा प्रेम चोपडा’ या नाटकात संजय मोने आणि जितेंद्र जोशी यांच्यासोबत काम करत होते. त्याचवेळी मला कळलं, की मी प्रेग्नंट आहे. त्याचदरम्यान ‘परिवार’ नावाची हिंदी मालिका सुरू होती आणि दोन मोठे प्रोजेक्ट्स येऊ घातले होते. त्यापैकी एक मालिका होती ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’, ज्यात मी तारक मेहताच्या पत्नीची भूमिका साकारणार होते. पायलट एपिसोड्स पूर्ण झाले होते आणि पुढे मालिका सुरू होण्याच्या तयारीत असताना मला माझ्या गरोदरपणाचं समजलं. मग निर्मात्यांना सांगितलं, की मी गरोदर आहे आणि माझ्या जागी दुसरी अभिनेत्री शोधावी लागेल, कारण मी काम करू शकणार नाही. त्यावेळी मला वाटलं की, मला बेडरेस्ट लागणार आहे. त्या काळात मी तीन मोठे प्रोजेक्ट्स सोडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.