Justin Bieber : जस्टिन बीबरला झाला होता रामसे सिंड्रोम, काय आहे हा आजार अन् त्याची लक्षणे काय आहेत?

Justin Bieber In India : आता अनंत राधिकाच्या विवाहासाठी जगप्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बीबर भारतात आला आहे.
Justin Bieber
Justin Bieberesakal
Updated on

Justin Bieber :

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडींग सोहळ्याला अनेक मातब्बर मंडळींनी हजेरी लावली होती. आता अनंत राधिकाच्या विवाहासाठी जगप्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बीबर भारतात आला आहे.

जस्टिन आज जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आपलं गाणं सादर करणार आहे त्यासाठी त्याने तब्बल ८३ कोटी रुपये घेतले आहेत. या सोहळ्यासाठी तो पिचेस आणि बेबी ही त्याची गाजलेली गाणी सादर करणार आहे. सोबतच लव्ह युअर सेल्फ हे गाणंही तो गाणार आहे. (Health)

Justin Bieber
Justin Bieber: राधिका-अनंतच्या संगीत सोहळ्यासाठी आलेल्या जस्टिन बिबरने मुंबईत उतरताच सगळ्यात आधी केली 'ही' गोष्ट

जस्टीन सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी ते भारतात आले आहेत. जस्टिन बीबर केवळ त्याच्या गाण्यासाठी प्रसिद्ध नाही तर तो त्याच्या आजारपणामुळेही चर्चेत होता. एका विचित्र आजाराने तो ग्रस्त होता. तो आजार कोणता होता याबद्दल अधिक माहिती घेऊयात.

जस्टीनला अर्धांगवायू झाला होता. अर्धांगवायूचा झटका आल्याची अनेक प्रकरणे ऐकली असतील. पण, जस्टीनच्या बाबतीत जे झालं ते क्वचित घडणारं होतं.

Justin Bieber
Justin Bieber: भारतीयांच्या उत्साहावर पाणी; प्रकृती बिघडल्याने जस्टिन बीबरची वल्ड टूर कँसल

अवघ्या जगाला वेड लावणारा गायक जस्टिन बीबर (Justin Bieber) सध्या एका गंभीर आजाराशी झुंज देतो आहे. जस्टिन बीबरला ज्या आजाराने ग्रासले आहे त्याचे नाव रामसे हंट सिंड्रोम आहे. नाव ऐकल्यानंतर हा कोणत्या प्रकारचा रोग आहे याचा अंदाज लावणे कठीण आहे.

पण यात मुख्य म्हणजे या आजाराने बळी पडलेल्या व्यक्तीचा चेहरा अर्धांगवायू झाल्यासारखा दिसू लागतो. हा आजार काय आहे, आणि त्याची लक्षणे काय आहेत याबद्दल अधिक माहिती घेऊयात.

Justin Bieber
Justin Bieber: जस्टिन बिबरनं चाहत्याची माफी का मागितली?

रामसे हंट सिंड्रोमची लक्षणे

रॅमसे हंट सिंड्रोममध्ये पीडित व्यक्तीचा चेहऱ्याला अर्धांगवायू होतो. त्यामुळे डोळ्यांची पापणीही मिटता येणं कठीण होतं. यामुळे, कॉर्निया खराब होण्याची भीती आहे.  

अर्धांगवायूच्या बाजूला कानात दुखणे, मान दुखणे, श्रवणशक्ती कमी होणे अशी ही या सिंड्रोमची लक्षणे आहेत. बोलताना अडखळणे हे देखील या आजाराचे लक्षण आहे.

Justin Bieber
कॅनडात आणीबाणी जाहीर; PM Justin Trudeau यांनी घेतला मोठा निर्णय

रामसे हंट सिंड्रोम

रामसे हंट सिंड्रोम (RHS) हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार आहे. यामध्ये कानाभोवती, चेहऱ्यावर किंवा तोंडावर पुरळ येतात, जे वेदनादायक असतात. याशिवाय रुग्णाच्या चेहऱ्यावर अर्धांगवायूही होऊ शकतो. यामुळे बहिरेपणाची गंभीर समस्याही उद्भवू शकते. जेव्हा, व्हेरिसेला-झोस्टर विषाणू डोक्याच्या मज्जातंतूंना संक्रमित करतो, तेव्हा हा दुर्मिळ आजार होतो.

रामसे हंट सिंड्रोमवरील उपाय

रामसे हंट सिंड्रोम बऱ्याच प्रमाणात बरा होऊ शकतो. वेळेवर आणि विशेषत: आजार झाल्याच्या तीन दिवसांत योग्य उपचार सुरू केले, तर रामसे हंट सिंड्रोम बरा होऊ शकतो.

याशिवाय आवश्यक औषधेही दिली जातात. डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी काही डोळ्यांचे ड्रॉप्स वापरण्याचा सल्ला दिला जातो. हा सिंड्रोम बायोप्सी, एमआरआय आणि रक्त तपासणीद्वारे शोधला जाऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()