kanchipuram idli : कांचीपुरम इडली कशी बनवायची माहितीय का? जाणून घ्या हेल्दी नाश्त्याची रेसिपी

Healthy Breakfast Recipe : आजवर आपण कांचीपुरम साडीचे नाव ऐकले असले. पण, साडी प्रमाणेच कांचीपुरम इडली सुद्धा प्रसिद्ध आहे.
Healthy Breakfast Recipe
Healthy Breakfast Recipe esakal
Updated on

kanchipuram idli :

लोकांचा दाक्षिणात्य पदार्थांमध्ये इडली हा आवडता पदार्थ आहे. आपल्याकडे जसे एकाच प्रकाराचे अनेक उप प्रकार आहेत तसे कांचीपुरम इडली हा सुद्धा लोकप्रिय प्रकार आहे.

आजवर आपण कांचीपुरम साडीचे नाव ऐकले असले. पण, साडी प्रमाणेच कांचीपुरम इडली सुद्धा प्रसिद्ध आहे. ही इडली कशी बनवायची हे पाहुयात. (Breakfast Recipe)

Healthy Breakfast Recipe
Bajra Idli Recipe: नाश्त्यात चविष्ट आणि हेल्दी खायचे आहे? मग बनवा बाजरीची इडली, पाहा रेसिपी!

साहीत्य –

२ फुलपात्रं उकडा तांदूळ, १ फुलपात्रं उडदाची डाळ, अर्धे फुलपात्रं हरबरा डाळ, पाव चमचा हिंग, १ च. चमचा काळे मिरे, १ टी. स्पून जिरे, थोडे आले किसून, थोडा कढीलिंब, थोडे काजूचे तुकडे, चवीनुसार मीठ.

Healthy Breakfast Recipe
Matar Paratha Recipe : नाश्त्यासाठी बनवा टेस्टी 'मटार पराठा', ही आहे सोपी रेसिपी..

कृती :

तांदूळ, उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ रात्री भिजत घालून सकाळी वाटून पीठ आंबायला ठेवावे.

जिरे व मिरे जाड कुटून, हिंग व मीठ पिठात घाला.

थोडे तेल गरम करून काजू तुकडा व कढीलिंब तळून तेलासकट पिठात घाला. आले किसून घालावे नंतर पीठ खूप फेटावे.

पीठ फेटून स्टँडवर इडल्या वाफवून घ्याव्यात, चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.