Kareena Kapoor Fitness Funda : फिटनेस असो किंवा काम करीना कपूर पूर्ण मनापासून करते अशी तिची ख्याती आहे. म्हणूनच तिची झीरो फिगर असो किंवा दोन मुलांची आई झाल्यावरही तिने फिटनेस कसा राखला याविषयी उत्सुकता असतो. तिच्या फिटनेसचं हेच सिक्रेट आम्ही ओपन करत आहोत.
करीना वर्क आऊट बरोबर रोज योगासनं ही करते. दोन मुलांनंतर फिटनेस राखणं सोपं नसतं. पण हा अवघड टास्कही तिने करून दाखवला आणि एक आदर्श समोर ठेवला. करीना कोणते योगासनं करून फिट राहते जाणून घेऊया.
सेतुबंधासन
सहजता आणि उत्साहवर्धक वॉर्म अप म्हणून हे आसन करीनाचं आवडतं आसन आहे. हे आसन तिच्या रुटीनचा भाग आहे.
मार्जारान
प्लँकचं नेक्स्ट लेव्हल आसन असंही आपण या आसनाला म्हणू शकतो.
वृक्षासन
करीना हे आसन बॅलंसिंग पोज केक वॉकसारखं वापरते. बॉडी टोंड करण्यासाठी याचा वापर करते.
नटराजासन
स्ट्रेंग्थ, लवचिकता आणि बॅलंस राखण्यासाठी करीना रोज नटराजासन करते.
ताडासन
ताडासनामुळे तिला पोस्चर आणि बॉडी कॉर्डीनेशन चांगलं राखण्यास मदत मिळते.
उर्ध्व मुखासन
हे सुध्दा करीनाचं एक आवडतं आसन आहे. यामुळे लंग्ज, लिव्हर आणि पँक्रीयाजची स्ट्रेंग्थ वाढते.
उष्ट्रासन
जर करीनासारखी बारीक कंबर तुम्हालाही हवी असेल तर हे आसन तुम्हीही करा. यामुळे पोटावरची चरबी कमी होऊन मेटाबोलिझम सुधारते.
सर्वांगासन
जर तुम्हाला टोंड आणि छोटी कंबर हवी असेल तर हे आसन नियमित करावं.
हस्तपादासन
हे आसन पाठीच्या कण्यासाठी आणि शरीराचा बॅलंस राखण्यासाठी उपयुक्त आहे.
अधोमुखासन
हे आसन करताना करीना आणि तिचा डॉग याची नकल करत असेलला फोटो व्हारल झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.