हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. हा दिवस देवी लक्ष्मीला भगवान श्री हरिपेक्षा अधिक प्रिय मानला जातो. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने माणसाचे सर्व संकट दूर होतात, अशी धार्मिक मान्यता आहे.
कार्तिक पौर्णिमेदिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला होता. त्यामुळे भगवान शिवही त्रिपुरारी नावाने पूजले जाऊ लागले. हे नाव भगवान विष्णूने शिवाला दिले होते. त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. त्रिपुरासुराच्या वधानंतर या दिवशी जगातील सर्व देवतांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली. म्हणूनच याला देव दिवाळी असेही म्हणतात.