Kashi Halwa Recipe : काही लोकांसमोर शिऱ्याचं नावं काढलं की डोळ्यासमोर फक्त रवा घातलेला शिराच आठवतो. पण गोड पदार्थ म्हटलं की साजूक तूप, कधी दुधातला तर कधी प्रसादाचा शिरा आठवतो.तसे जगभरात शिरा प्रेमी खूप आहेत. अशाच लोकांसाठी आज आपण कोहळ्यापासून शिरा कसा बनवायचा ते पाहुयात.
अनेक औषधी गुणधर्म असलेला कोहळा हा आरोग्यासाठी फायदेशीर असतो. असे असूनही अनेकांना कोहळाचे फायदे माहित नसतात. यासाठी येथे कोहळा खाण्याचे फायदे याविषयी माहिती दिली आहे. मिठाईसारख्या बऱ्याच पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो.
याला English मध्ये Ash Gourd किंवा Winter Melon असे म्हणतात. आयुर्वेदातही कोहाळ्याला खूप गुणकारी मानले आहे. आयुर्वेदानुसार कोहळा हा शीत, स्निग्ध गुणांचा असून वात-पित्त कमी करणारा, बुद्धीवर्धक आणि बल वाढवणारा आहे. याचे फायदे जाणून घेऊयात.
हृदयासाठी उपयुक्त
कोहाळात भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि व्हिटॅमिन-C असते. हे घटक हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी आवश्यक असतात. पोटॅशियममुळे रक्तवाहिन्यामधील तणाव कमी करून रक्तदाब कमी करण्यास मदत होते.
रक्तदाब नियंत्रित करून शरीरात योग्य रक्त प्रवाह राखला जातो. अशाप्रकारे, कोहळा हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये असलेले व्हिटॅमिन-C हार्ट अटॅकची शक्यता कमी करण्यासाठी उपयुक्त असते.
अॅसिडिटी कमी करते
जर आपल्याला अॅसिडिटीची समस्या असल्यास तर कोहळ्याचा रस तयार करून त्यात थोडीशी हिंगाची पूड घालावी. कोहाळ्याचा रस दररोज सकाळी व संध्याकाळी प्यावा. यामुळे आम्लपित्तपासून आराम मिळण्यास मदत होते. अॅसिडिटीबरोबरच अल्सरचा त्रासही कमी होण्यास कोहळा फायदेशीर असतो.
पोट साफ ठेवते
कोहाळ्यात फायबर्सचे प्रमाण मुबलक असते. कोहळा खाण्यामुळे नियमित पोट साफ होण्यास मदत होते. तसेच पोटात जंत किंवा कृमींचा त्रास असल्यास त्यावरही कोहळा खूप उपयोगी ठरतो.
मूळव्याधमध्ये उपयुक्त
मूळव्याधाचा त्रास होत असल्यास त्यावरही कोहळा फायदेशीर ठरतो. यासाठी कोहळ्याचा 2 चमचे गर, 1 चमचा गूळ, 1 चमचा तीळ आणि अर्धा चमचा हिरड्याचे चूर्ण एकत्र मिसळून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण दिवसातून दोनदा दुधाबरोबर प्यावे. यामुळे मुळव्याधची समस्या लवकर दूर होण्यास मदत होते. तसेच मूळव्याधीत होणाऱ्या बद्धकोष्ठता आणि रक्त पडणे या समस्याही दूर होतात.
वीर्य वाढवते
ज्या पुरुषांची प्रजनन क्षमता कमी असते त्यांच्यासाठी कोहळा खाणे फायदेशीर असते. याच्या नियमित सेवनाने शुक्राणूंची संख्या वाढू शकते.
आता आपण कोहळ्यापासून शिरा कसा बनवायचा ते पाहुयात.
कोहळ्याचा हलवा करण्यासाठीचे साहित्य
अर्धा कोहळा
१/४ कप तूप
१ कप साखर
1 टेबल स्पून किशमिश
१ मूठभर काजू
आवश्यक असेल तर वेलचीपूड
३ टीस्पून दूध
1 चिमूट केशर
कृती
- सर्वप्रथम एका छोट्या भांड्यात दूध घेऊन त्यात केशर घालून चांगले भिजू द्यावे. यामुळे पुडिंगचा रंग आणि चव दोन्ही वाढते.
- यानंतर कोहळा नीट धुवून त्याची साल काढावी. आता त्यांचे छोटे छोटे तुकडे करून मग किसून घ्या. एका बाजूने बाजूला ठेवा.
- आता कढई घ्या, कढईत किसलेला कोहळा घाला. पेठेतील पाणी पूर्ण पणे कोरडे होईपर्यंत गॅसवर मध्यम आचेवर शिजवावे. पाणी पूर्णपणे कोरडे होण्यास ४ ते ५ मिनिटे लागतात. त्यानंतर कढईत साखर घालून चांगले मिक्स करावे.
- साखर चांगली मिसळली की त्यात दूध आणि केशर यांचे मिश्रण घालून चमचा नीट ढवळून थोडा वेळ शिजवावा. त्यानंतर प्लेटमध्ये काढून काजू बदामाच्या तुकड्यांनी सजवून सर्व्ह करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.