Katrina’s Fitness secret : पस्तीशीनंतर बेढब शरीर अन् सुटलेलं पोटं? कतरिनाचे सिक्रेट जाणून घ्याल तर फिट रहाल!

या अभिनेत्रीही पहा. ३०, ४० अगदी ५० शी ओलांडली तरी फिट राहतात
Katrina’s Fitness secret
Katrina’s Fitness secret esakal
Updated on

वयाची पस्तीशी ओलांडली की अनेक महिला उतरती कळा लागल्यासारखे गुढगे, कंबर धरून बसतात. आपण म्हातारपणाकडे वळायला लागलो आहोत असे फिलिंग त्यांना चेहऱ्यावरील सुरकूत्या अन् सुटलेल्या पोटाकडे पाहून येत असते. त्यातही एखादी महिला डायट करून फिट राहत असेल तर तिलाच नाव ठेवण्यात इतर महिलांचा टाईमपास होतो.

आता या अभिनेत्रीही पहा. ३०, ४० अगदी ५० शी ओलांडली तरी फिट राहतात. तसेच आज एका अभिनेत्रीकडून काही खास टिप्स घेऊयात. ती अभिनेत्री आहे कतरिना कैफ कौशल. कतरिना केवळ तिच्या सौंदर्यासाठीच नाही तर तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते.

Katrina’s Fitness secret
political leader: कोण आहेत देशातील टॉप फिटनेस राजकारणी?

वयाच्या 35 व्या वर्षीही कतरिना अगदी फिट आणि उत्साही दिसते. फिट राहण्यासाठी ती नक्कीच मेहनत घेते. त्याचसोबत ती खास डायटही फॉलो करते.फिट राहण्यासाठी कतरिना नियमित व्यायाम करते. आठवड्यातून 3-4 दिवस जिमला जाणे हा तिच्या फिटनेस रूटीनचा एक भाग आहे. तर कतरिनाही तिचे डायट काटेकोरपणे फॉलो करते.

Katrina’s Fitness secret
Bollywood Diwali: कतरिना कैफचं लग्नानंतरच पहिलं दिवाळी सेलिब्रेशन...

लग्नानंतरही कतरिना कैफने तिच्या आहारात फारसा बदल केला नाही. तिने नेहमीच तिच्या आहारात हेल्दी फूडला महत्त्व दिले आहे. शूटिंग, सुट्टी अशा वेळापत्रकातही ती तिच्या आहाराचे पालन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते.

Katrina’s Fitness secret
Weight Loss : फक्त १० मिनिटांचा व्यायाम देईल सडपातळ पोट

कतरिना एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी आणि शरिराला योग्य प्रमाणात पोषण मिळावे यासाठी खास स्मूदी घेते. या स्मूदीमध्ये ती अॅव्होकॅडोला समावेश करते. अॅव्होकॅडो हे व्हिटॅमिन ई आणि इतर पोषक तत्वांचा सोर्स आहे. ते खाल्ल्याने त्वचा, डोळे आणि हाडांसाठी अनेक फायदे होतात.

Katrina’s Fitness secret
KBC 14 : 'तू नुसताच बर्गर खातोस तर मग कतरिना काय करते?' नेटकऱ्यांचा विकीला प्रश्न

कतरिनाला नाश्ता करायला वेळ मिळत नाही. तेव्हा तिला ही स्मूदी प्यायला आवडते. मिनी माथूरसोबतच्या एका कार्यक्रमात तिने हे स्वत: सांगितले आहे. कतरिना कैफची ही आवडती स्मूदी कशी बनवली जाते आणि त्यात आणखी कोणते हेल्दी पदार्थ घालता येतील ते जाणून घेऊया.

Katrina’s Fitness secret
Heart Care : फिटनेस प्रेमींनो सावधान! प्री वर्कआऊट सप्लीमेंट ठरू शकतात हार्ट अ‍ॅटॅकच कारणं

कशी बनवावी हेल्दी स्मूदी

1 अॅव्होकॅडो,1 चमचे खोबरेल तेल, 1-2 पिकलेली केळी, 4-5 पाने पालक, 6-7 पुदिन्याची पाने, 2 चमचे चिया बि, 1 चमचे लिंबाचा रस, 1 चमचा कोको पावडर, गोडपणासाठी खजुर बारीक चिरलेले किंवा मध आणि थंड हवे असेल तर बर्फाचे तुकडे.

Katrina’s Fitness secret
नाष्ट्यात साउथ इंडियन फूड खा, अन् बिंदास वजन कमी करा!

या सर्व गोष्टी एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून त्याची स्मूदी करून घ्या. रोज सकाळी नाश्त्याच्या वेळी तूम्ही ती घेऊ शकता. यामूळे दिवसभर फ्रेश वाटेल आणि फिटनेसही कायम राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.