कोल्हापूर : आज अनेक मुली केसांच्या विविध समस्यांना कंटाळल्या आहेत. केस गळणे केस तुटणे यासह अनेक प्रश्न त्यांच्या समोर आहेत. चांगली झोप आणि तणावमुक्त जीवन याबरोबरच केसांच्या रक्षणासाठी विटामिन्स आणि अनेक प्रकारचे पोषक तत्वांची गरज असते जे आपल्या त्वचेची देखभाल करतात. केराटीन एक असे प्रोटीन आहे आपले केस डॅमेज होण्यापासून वाचवते. स्मूधनिंग आणि रिवायडींग नंतर केराटिन ट्रीटमेंट महिलांच्या मध्ये प्रचंड लोकप्रिय आहे या ट्रीटमेंटमुळे केस सुंदर दिसतात.
केराटीन एक इंसोलबल फायबर प्रोटीन आहे. जे आपल्या केसांमध्ये आणि नका मध्ये आढळते. हे केसांमध्ये बाह्यरूप बनवते जेव्हा केसाचे बाह्य आवरण खराब होते तेव्हा त्याची चमक कमी होते व ते डॅमेज होऊ लागतात. केराटीन केस मऊ करतात व आपल्याला पाहिजे तसे आकार देण्यासाठी मदत करतात. केराटीन मुळे केसांना मॉइश्चरायझर होते व ते केसमध्ये एक नवीन जान आणतात.
घरामध्येच करा केराटिन केसांची देखभाल
जेव्हा तुम्ही केराटिन ट्रीटमेंट घेता तेव्हा जरुरी असते की तुमच्या केसांची देखभाल व्यवस्थित करणे. वारंवार हेअर स्टाईल साठी विविध उपकरणाचा वापर करू नका. त्याच्या उष्णतेमुळे केसांमध्ये पुन्हा निर्जीवपणा येतो. अनेक वेळा सलून वाले महागडे शाम्पू आणि कंडिशनर आपल्याला देतात. परंतु तुम्ही याच्याशिवाय घरी तुमच्या केसांची देखभाल करू शकता. केसाच्या सुरक्षिततेसाठी घरातच हेअर मास्क तयार करा. हे महागडे ही नसते आणि तुम्हाला सोयीस्कर ठरते. तुम्ही घरामध्ये हेअर मास्क सहजपणे करू शकता. केराटिन ट्रीटमेंट झालेल्या केसावर होम मेड हेअर मास्क कसे करायचे हे आपण पाहूया.
अंडे, बदाम आणि मध हेअर मास्क
अंड्याच्या आतील बलक मध्ये प्रोटीन आणि फॅटी ऍसिड असते बदामच्या तेलाममध्ये अनेक पोषक तत्वे असतात. हे केसांचा मऊपणा कायम ठेवतो. हे मिश्रण लावल्यामुळे केस सुंदर आणि मऊ राहतात. एक अंडे, बदामचे तेल आणि एक चमचा मध एका बाउल मध्ये मिक्स करा. पंधरा ते वीस मिनिट हे केसमध्ये लावा. त्यानंतर पाण्याने धुवा यामुळे आपल्या केसात नक्कीच फरक जाणवेल.
केळ आणि एवोकाडा हेअर पॅक
केळीमध्ये अमिनो ऍसिड असते जे आपल्या केसांच्या मुळाला प्रोटीन देते. तसेच एवोकाडा हे विटामिन सी ने समृद्ध असते. हे शानदार हेअर पॅक आपल्या केसांना जरूर विटामिन्स पोहोचवतात आणि आपले केस फ्रीजी होण्यापासून वाचवतात. एका बाऊलमध्ये एक केळ घ्या त्यामध्ये एक एवोकाडा आणि व्हीट जर्म ओईल आणि रोज आईल मिक्स करा आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट 45 मिनिटे लावा आणि त्यानंतर पाण्याने धुऊन सामान्य शाम्पूचा वापर करा.
नारळाचे दूध आणि हिबिस्कस हेअर मास्क
नारळाच्या दूधामध्ये चांगल्याप्रकारे प्रोटीन असतात जे आपल्या केसांना स्वस्थ बनवतात. हिबिस्कस अमिनो ऍसिड भरपूर समृद्ध असते जे केसांना पोषण देते आणि केसांचे मूळ घट्ट बनवते. या मास्क मुळे केसांच्या वाढीसाठी मदत होते. नारळाचे दूध हिबिस्कस पावडर, शहद आणि एलोवेरा जेल हे चांगल्या पद्धतीने मिक्स करा आणि तयार झालेली पेस्ट 30 ते 40 मिनिटे केसावऱ ठेवा. त्यानंतर पाण्याने धुवा. हे मास्क केसांना कोरडे होण्यापासून वाचवते तसेच केस चांगले ठेवते.
एवोकाडा आणि कोकोनट मिल्क हेअर पॅक
एवोकाडा हे आपल्या कोरड्या तसेच डॅमेज केसांना चांगले फायदेशीर ठरते. यामध्ये फॅटी अमिनो ऍसिड व्हिटॅमिन बी, डी . भरपूर प्रमाणात असते. एवोकाडा आणि नारळाचे दूध आपल्या केसांच्या त्वचेला अधिक समृद्ध बनवते. त्याच बरोबर केस मजबूत राहतात आणि त्यामुळे चमकदार ही होतात. एक पिकलेले एवोकाडो आणि दोन चमचा नारळाचे दूध चांगल्या पद्धतीने मिक्स करा. हे मिश्रण 30 मिनिटे केसांना लावा त्यानंतर केस सल्फेट फ्री शांपूने धुवा.
डिस्क्लेमर :ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.