Kidney Health Tips : धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला आरोग्याच्या अनेक तक्रारी होत असतात. कधी सर्दी, ताप तर कधी अचानक होणारी पोटदुखी. पण आज जाऊ उद्या जाऊ म्हणत आपण डॉक्टरकडे जाणं टाळतो. आजारपणाकडे केलेलं दुर्लक्ष तुमच्या जीवावरही बेतू शकतं.
होय, अगदी किरकोळ वाटणारी पोटदुखी, छातीत येणारी कळ, ओटीपोटातल्या वेदना याकडे गांभिर्याने पहायला हवंय. कारण, या वेदनांकडे केलेलं दुर्लक्ष तुम्हाला चांगलाच फटका देऊ शकतं. आता ओटीपोटीत होणाऱ्या वेदना या किडनीमुळे होऊ शकतात. जर तुमच्या किडनीला काही प्रॉब्लेम असेल तर ती तुम्हाला काही लक्षण दाखवत असते. पण आपण त्याला गांभिर्याने घेत नाही. (Kidney Health Tips : These 5 symptoms are seen when there is a weak kidney, know the preventive measures)
किडनी आपल्या शरीरातील एक महत्वाचा भाग आहे. शरीरात असलेले विषारी पदार्थ वॉटर प्युरीफायर प्रमाणे ती फिल्टर करते. किडनी निकामी झाल्यास, किंवा तिने काम करणं बंद केल्यास तुमच्या शरीरात विष वाढू शकतं.ज्यात तुमचा मृत्यूही होऊ शकतो.
तुम्हाला या धोक्यापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. किडनीत बिघाड झाल्यास आपल्या शरीरात काही लक्षणं दिसतात. ती कोणती आहेत आणि त्यावर काय उपाय करायचे याबाबतच आज माहिती घेऊयात.(Health Tips)
लघवीचा रंग ओळखा
किडनीत बिघाड झाला तर लघवीमध्ये सर्वात पहिलं लक्षण दिसतं. लघवीचा रंग नॉर्मली फिकट पिवळा, पांढरा असतो. पण किडनीवर इफेक्ट झाला की लघवीचा रंग बदलतो. लघवीचा रंग गडग पिवळा, लालसर दिसतो आणि त्याचा वासही जास्त येतो. लघवीतून केवळ पाणीच नाहीतर फेसही पडतो. तेव्हा तुमच्यात जर हा बदल जाणवला तर वेळीच डॉक्टरांची भेट घ्या. (Urine Infection)
कमी भूक लागणे
प्रत्येकाला असं कधी ना कधी वाटतं, की मला भूकच नाहीय, भूक लागत नाहीय. तुम्हालाही असं वाटतं असेल तर त्याकडे गांभिर्याने लक्ष द्या. भूक कमी लागणे, उलट्या, मळमळल्यासारखे वाटणे हे किडनीच्या आजाराचे लक्षण आहे. यासोबतच पोटदुखीचा त्रास होत असेल लवकरच उपचार घ्या.
शरीरावरील सूज
तुमची किडनी आजारी पडली तर तुमच्या पायांवर सूज येते. तर काहींचे संपूर्ण शरीरावर सूज दिसू लागते. काहींच्या डोळ्यांखाली गालावर सुज दिसते. किडनीचा आजार असलेल्यांनी रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनीही वेळोवेळी किडनीची तपासणी करून घ्यावी.
फुफ्फुसावर होतो थेट परिणाम
किडनीची समस्या सुरू झाली की आपल्या फुफ्फुसांवर परिणाम होतो. फुफ्फुसावर आलेली सूज हे बिघडलेल्या किडनीचे लक्षण आहे. श्वासोच्छवासाची समस्या हे देखील मूत्रपिंडाच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे. जेव्हा मूत्रपिंडाची समस्या उद्भवते तेव्हा फुफ्फुसात सूज येते, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
किडनीची काळजी कशी घ्यावी
आहार आणि पाणी
किडनीचा त्रास असेल योग्य आहार घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार आणि पथ्य सुरू ठेवा. किडनी कधीच खराब होऊ नये असे वाटत असेल तर तुम्हाला एक सवय लावून घेणे गरजेचे आहे. तुमच्या शरीराला जशी अन्नाची गरज आहे तशीच पाण्याचीही गरज आहे. शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळालं तर तुम्हाला किडनीचा त्रास होणार नाही.
असे करा डायट
तुमच्या डायटमध्ये लिंबूवर्गीय फळे, ब्रोकोली आणि हिरव्या पालेभाज्यांचे सेवन सुरू करा, हे मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. कोथिंबिरीचे सेवन करा, यामुळे मूत्रपिंडाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. आल्यामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म मूत्रपिंडाच्या समस्येवर प्रभावी असतात. (Healthy Diet)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.