Kidney Stone Remedies : मुतखड्याचं दुखणं अंगावर काढू नका, या फळांचं पाणी प्यायाला सुरू करा, फरक पडेल!

आपण पाणी कमी प्यायलो तर मुतखड्याचा त्रास उद्भवतो का?
Kidney Stone Remedies
Kidney Stone Remediesesakal
Updated on

Kidney Stone Remedies :

आजकाल शारीरिक व्याधी होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही आजार वरून दिसतात तर काही आपल्या शरीराला आतून पिळून काढतात. त्यापैकीच एक आजार म्हणजे मुतखडा होय. याला इंग्रजी भाषेत किडनी स्टोन म्हणून आपण ओळखतो.

लहान मुलं, तरूण आणि वृद्ध अशा सगळ्यांनाच हा आजार होऊ शकतो. साधारणपणे, लघवी रोखून धरल्याने किंवा हा आजार होऊ शकतो. मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मुतखडा म्हणतात.

लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मुतखडा तयार होतो. मुतखड्याचे दोन प्रकार पडतात त्यापैकी एक म्हणजे, कॅल्शियम पासून कॅल्शियम ऑक्झॅलेटचे किंवा कॅल्शियम फॉस्फेटचे खडे तयार होतात.

Kidney Stone Remedies
Kidney Stone : मुलांना किडनी स्टोन होऊ नये म्हणून त्यांच्या आहारातून आजच वगळा हे पदार्थ

आणि दुसरे म्हणजे, रक्तातील व लघवीतील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याने युरिक अ‍ॅसिडचे मूतखडे तयार होतात. या आजारात पोटात प्रचंड वेदना होतात. काही वेळा लघवी करताना त्रास होतो, जळजळ वाढते अशी लक्षणे दिसतात.

या गंभीर आजारावर एका फळाचे पाणी फायदेशी आहे. ते फळ म्हणजे नारळ. होय, मुतखड्याच्या आजारावर नारळपाणी रामबाण उपाय आहे. त्याचे काय फायदे आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात.

मुतखड्याच्या आजारावर नारळपाण्याचे जास्त सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कारण, शरीरात असलेली पाण्याची कमतरता नारळाचे पाणी भरून काढते. नारळ पाणी आपल्या शरीराला डिटॉक्स करते.

Kidney Stone Remedies
Stone Pelting on Pakistan Team:भारतात चक्क आमच्यावर दगडफेक झाली होती, आफ्रिदीचा खळबळजनक दावा

नारळाच्या पाण्यात पोटॅशियन, मॅग्नेशियम,शुगर कार्ब्स, मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. हे गुणधर्म आपल्या शरीराला हाडड्रेड ठेवतात. त्यामुळे शरीराला कधीच पाण्याची कमी भासत नाही. त्याचा फायदा आपल्या मुतखड्याच्या विकारावर होतो.

मुतखड्याचा त्रास कमी करते

नारळपाण्यातील पोटॅशियम मुतखड्याचा धोका कमी करते, त्यामुळे मुतखड्याचा त्रास असेल त्यांनी नारळपाणी प्यावे असे न्युट्रिशनिस्ट नमामी अग्रवाली सांगतात. तसेच, नारळपाण्यातील पोषक घटक तुम्हाला अन्न पचवण्यास मदत करतात.

Kidney Stone Remedies
Stone Pelting at Ram Navami: पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक, अनेक जण जखमी

हाडांचे दुखणे पळवते

नारळपाण्यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे, आपल्या हाडांचा विकास होतो आणि हाडे मजबूत होतात. त्यामुळे लहानमुलांनाही नारळ पाणी देण्यास सांगितले जाते.

रक्तदाब नियंत्रित करते

पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने नारळाचे पाणी रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकते. पोटॅशियम युक्त आहार रक्तदाब नियंत्रित करून आणि स्ट्रोकपासून संरक्षण करून हृदयाच्या आरोग्यास मदत करू शकतो.

एनर्जी देते

उन्हाळ्यात सतत आपला घाम जातो, त्यामुळे आपली एनर्जी संपते. थकल्यासारखे वाटते, यावर नारळपाणी इंस्टंट उपाय आहे. कारण, उन्हाळ्यात फार काही खायची इच्छा होत नाही. त्यामुळे, एक ग्लास नारळाचे पाणी प्यायले तर तुम्हाला आराम वाटू शकतो आणि तुमचे मन शांत होते .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.