Kitchen Hacks: पुरी,भजी तळून तेल कोळशासारखं काळ होतंय, ही ट्रिक वापरा तेल आहे असंच राहील

स्वयंपाक घरात तेल वारंवार वापरल्यावर ते खराब आणि काळे पडते. अशा परिस्थितीत अनेक वेळा लोक ते फेकून देतात.
Kitchen hack how to clean cooking oil after frying
Kitchen hack how to clean cooking oil after frying
Updated on

स्वयंपाकात तेल ही महत्त्वाची भूमिका बजावते. कोणताही पदार्थ तेलाशिवाय अपुर्ण आहे. सायंकाळी किंवा रात्रीच्या जेवणावेळी अनेकांना काहितर क्रिस्पी खाण्याची तल्लफ येते. यावेळी मग लगेच कढईत तेल गरम करुन कुठे पापड तळ तर कुठे भजी तेलात सोड असे अनेक तळणीचे पदार्थ स्वयंपाक घरात बनतात.

पण हेच तेल पुन्हा जेवणासाठी वापरताना गोंधळ होतो. अनेकजण ते तेल फेकून देतात तर काहीजण ते तेल तसेच जेवणाला वापरतात. पण तळणीचं उरलेलं तेल हे जळलेलं असत त्यामुळे या तेलाचा वापर करणं बहुतांश गृहिणी टाळतात. म्हणून तुमच्यासाठी आज आम्ही काही ट्रिक्स घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुमचे जळलेल तेल स्वच्छ होईल अन् त्याचा वापर तुम्ही पुन्हा करु शकाल. (Kitchen hack how to clean cooking oil after frying )

तेल स्वच्छ ठेवण्यासाठी ते वापरल्यानंतर थोडं थंड होऊ द्या. त्यानंतर ते तेल गाळा. गाळण्यासाठी पेपर कॉफी फिल्टर किंवा पेपर टॉवेल वापरा, बारीक जाळीची चाळण वापरा. असे केल्याने तेलामध्ये राहिलेलं बारिक कण निघून जातात. तेल पुन्हा वापरताना हे अन्न कण ते जाळू शकतात, म्हणून ते नेहमी गाळून ठेवा.

Kitchen hack how to clean cooking oil after frying
Kitchen Tips: डब्यातील भाजी बॅगमध्ये सांडते? 'या' ट्रिक्स वापरुन पाहा

आता जाणून घेऊयात काळं तेलं स्वच्छ कसं करायचं

कॉर्न-स्टार्च

तेल स्वच्छ करण्यासाठी कॉर्न-स्टर्चचा वापर करा. तेल आणि कॉर्न-स्टार्च यांचे मिश्रण मंद आचेवर गरम करा, ते उकळू न देण्याची काळजी घ्या. हीट प्रूफ स्पॅटुलासह सतत ढवळत रहा. कॉर्न-स्टार्च मिश्रण सुमारे १० मिनिटांत घट्ट झाले पाहिजे, नंतर ते गाळा.

Kitchen hack how to clean cooking oil after frying
Kitchen Tips: स्टफिंग पराठा बनवताना सारण बाहेर निघतं का? फॉलो करा 'या' टिप्स

लिंबाचा वापर

लिंबू हा आरोग्यासाठीच नव्हे तर घरातील बऱ्याच गोष्टींसाठी फायद्याचा आहे. आजपर्यंत आपण लिंबाचे अनेक उपयोग जाणले आहेत. हाच लिंबू तुमचे जळलेलं तेल स्वच्छ करण्यासही मदत करतो.

लिंबाच्या मदतीने तुम्ही काळे तेलही स्वच्छ करू शकता. यासाठी तेल गरम केल्यानंतर लिंबाचे छोटे तुकडे करून त्यात घाला. यामुळे तेलाचे काळे कण लिंबाला चिकटतील, जे तुम्ही गाळून घ्या. मग तुम्हाला तुमचे तेल नवीनसारखे दिसेल.

Kitchen hack how to clean cooking oil after frying
Best Kitchen : किचन कसं असावं.? त्यात कोणत्या गोष्टी असल्यावर काम अधिक सोपं होईल; माहिती घेऊया किचन गॅजेट्सची

योग्यजागी तेल स्टोअर करा

अनेक महिला स्वयंपाकाचे तेल वापरल्यानंतर गॅसजवळ ठेवतात. पण याचा तेलावर विपरीत परिणाम होतो.

गॅसमधून निघणाऱ्या उष्णतेमुळे तेल खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे तेलाचा पुनर्वापर करण्यासाठी ते उष्णता आणि गरम ठिकाणांपासून दूर ठेवणे गरजेचं आहे. याशिवाय तेल खराब होऊ नये म्हणून ते हलक्या आणि दमट ठिकाणांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.