Kitchen Hack : स्वयंपाक करताना नेहमी अन्न भांड्याला चिकटतं त्यामुळे नॉर्मल कुकवेअरमध्ये जास्तीचं तेल टाकावं लागतं. सोबतच वारंवार फुडला भांड्याला चिकटू नये म्हणून चमच्याने फिरवावं लागतं. अशात नॉन स्टिक भांडे या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी खूप चांगलं ऑप्शन आहे. ज्यामध्ये तेलही कमी टाकावं लागतं आणि अन्न सुद्धा चिकटत नाही. यात असलेल्या स्पेशल कोटींगमुळे हे होतं. (Kitchen Hack read how to wash non stick cookware read story )
या खास कोटींगमुळे या भांड्यांना धुताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे नाहीतर हे अन्न खराब होऊ शकतं आणि हे नॉन स्टिक भांडे सुद्धा नॉर्मल भांड्याच्या कॅटेगिरीमध्ये येतं
मुळात नॉन स्टिक भांडी खूप महाग असतात. त्यामुळे याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. आज आम्ही तुम्हाला नॉन-स्टिक भांड्यांना कसं साफ करायचं याविषयी काही खास टिप्स सांगणार आहोत.
अनेकदा नॉन-स्टिक भांड्यांनाही अन्न चिकटतंय मग हे भांडं धुताना 5 ट्रिक्स ट्राय कराव्यात. चला तर जाणून घेऊया.
नॉन स्टिक भांडी गरम असताना कधीही धुवू नये. धूण्यापूर्वी या भांड्याला थंड होऊ द्यावे. कारण गरम नॉन स्टिक कुकवेअर मध्ये पानी टाकल्याने कोटींग खराब होण्याची शक्यता अधिक असते.
नॉन स्टिक भांडी थंड झाल्यानंतर याला डिशवॉशनी कोमट पाण्यासह धुवावे. नॉन स्टिक भांड्यांना खूप वेळापर्यंत वर्किंग कंडीशनमध्ये ठेवण्यासाठी नेहमी गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याने धुवावे.
जेव्हा तुम्हाला तुमच्या भांड्यावर चमक हवी असते तेव्हा बेकिंग सोडा कामी येतो. नॉन स्टिक कुकींग दरम्यान जळले तर त्याला स्क्रबनी चुकूनही साफ करू नये. याऐवजी बेकींग सोडा आणि थोडं पाणी घेऊन घट्ट पेस्ट बनवावी आणि मऊ स्पंज नी साफ करावे. असं केल्याने भांड्यावर चमक येणार.
नॉन स्टिक भांड्यांना साफ करताना कधीही स्टील स्क्रब किंवा कोणताही स्क्रब पॅडचा उपयोग करू नये. यामुळे कोटिंगचं नुकसान होतं ज्यामुळे नॉन स्टिक भांड्यानाही फुड चिकटतं
तुम्हाला नॉन स्टिक भांड्यांना सीजन करण्याची आवश्यकता नाही. फक्त किचन टॉवलवर कुकिंग ऑईलचा एक थेंब घ्या आणि साफ करताना पॅनला पुसा. हे भांड्याचं कोटींग दिर्घकाळ टिकवेल आणि तुमचं भांडं नव्यासारखं चमकणार.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.