Kitchen Hacks : स्वादिष्ट आणि आरोग्यदायी जेवणासाठी किचनमधे योग्य भांडी असणेसुद्धा तितकेच महत्वाचे आहे. किचनमधील सामान्य भाड्यांमधल महत्वाचं भांडं म्हणजे लोखंडी कढई. हे किचनमधील असं पारंपारिक भांडं आहे ज्यात बरेच पदार्थ केले जातात. मोकळ्या भाज्यांसाठी याचा भरपूर वापर केला जातो. मात्र हे करत असताना लोखंडी कढईत हे पाच पदार्थ शिजवणं तुम्हाला किती महागात पडू शकतं माहितीये?
टोमॅटो - टोमॅटो नॅचरली अॅसिडिक असते. त्यामुळे ते लोखंडी कढईत शिजवल्यावर लोखंडाशी त्याची रिअॅक्शन होऊन पदार्थाची चव बिघडते.
पालक - पालकमधे ऑक्सॅलिक ऍसिड मुबलक प्रमाणात असते आणि जेव्हा ते लोखंडी पॅनमध्ये शिजवले जाते तेव्हा ते खराब होते तशीच काळी पडते. हे ऑक्सॅलिक ऍसिडसह लोखंडाच्या झालेल्या रिअॅक्शनमुळे होते. यामुळे जेवणाची चवही बिघडू शकते.
अंडी - बहुतेक लोक लोखंडी कढईत ऑम्लेट बनवतात. पण ऑम्लेट कधीही लोखंडी कढईत बनवू नये, असे तज्ज्ञांचे मत आहे. हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
ऑम्लेट किंवा इतर अंड्याचे पदार्थ बनवताना ते लोखंडी तव्याला किंवा कढईला चिकटलेले असल्याचे तुमच्या लक्षात आले असेल. म्हणूनच ऑम्लेट बनवण्यासाठी तुम्ही फक्त नॉन-स्टिक पॅन वापरा. (kitchen Hack)
मासे - लोखंडी भांड्यात किंवा पातेल्यात मासे कधीही शिजवू नयेत. कारण बरेच मासे असे असतात की ते चपळ असतात, त्यामुळे ते त्यांना चिकटतात. आपण खूप तेल किंवा लोणी वापरत असलो तरीही ते नंतर काढून टाकणे कठीण होते. अशा स्थितीत टेस्ट बिघडवण्यासोबतच जास्तीचे तेल आणि बटर आरोग्याला हानी पोहोचवण्याचे काम करते. तेव्हा मासे लोखंडी कढईत तळणे टाळा.
डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.