Kitchen Hacks : चहाला वेळ नसतेच, पण त्यामुळे भांड्याला डाग पडतात; ते कसे घालवायचे?

सकाळही चहाने होते, आजारी वाटत असेल तर चहा लागतो, काहींना तर केवळ तलफ म्हणून चहा लागतो. आता इतक्या वेळा चहा करणार, मग त्या चहाच्या भांड्याचं काय होईल?
Tea Container
Tea ContainerSakal
Updated on

भारतात चहा प्रेमींची कमतरता नाही. भारतात हे सर्वाधिक सेवन केलं जाणारं पेय आहे. आपल्यापैकी अनेकांचं आयुष्य या चहाशिवाय अपूर्ण आहे. सकाळही चहाने होते, आजारी वाटत असेल तर चहा लागतो, काहींना तर केवळ तलफ म्हणून चहा लागतो. आता इतक्या वेळा चहा करणार, मग त्या चहाच्या भांड्याचं काय होईल?

चहाचं भांडं काळं पडणं ही भारतातल्या प्रत्येक घरातली समस्या आहे. भांड्याला लागलेले काळे डाग घालवणं सोपं नसतं. हे डाग घालवण्यासाठी बऱ्याचदा स्टीलचा स्क्रब वापरतो, घासून घासून भांडं स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यामुळे भांडी लवकर खराब होतात. गरम पाण्यानेही अपेक्षित परिणाम मिळत नाही. पण मग ही भांडी कशी साफ करायची? जाणून घ्या... (Kitchen Tips)

Tea Container
Kitchen Hacks : काय सांगताय? तेलात नाही तर पाण्यातही तळता येतात पुऱ्या, कसं ते एकदा बघाच

बेकिंग सोडा आणि व्हाईट व्हिनेगर एकत्र मिसळून एक क्लिनिंग सोल्युशन तयार करावे. हे मिश्रण सर्व प्रकारच्या भांड्यांवरचे जळलेले डाग काढून टाकण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. यामध्ये जेव्हा आम्लयुक्त व्हिनेगर अल्कलाइनमध्ये मिसळले जाते, तेव्हा रासायनिक रिएक्शनमुळे हट्टी डागही कमी होतात.

जळलेले डाग कमी करण्यासाठी भांड्यात समान प्रमाणात पाणी आणि व्हिनेगर उकळवा आणि गॅस बंद करा. हे मिश्रण काढून टाका आणि त्यामध्ये बेकिंग सोडा टाका. थोड्या वेळाने स्पंज, नायलॉन ब्रश किंवा पॉली कार्बोनेट प्लास्टिक स्क्रॅपरने घासून घ्या.

डिशवॉशरच्या गोळ्या बाजारात सहज मिळतात, चहाच्या भांड्यात जळलेले डाग खूप दाट झाले की आधी एका भांड्यात पाणी गरम करा, नंतर त्यात डिशवॉशरची गोळी टाका आणि नंतर २ मिनिटे उकळा. आता गॅस बंद करा आणि भांडं थंड होण्याची वाट पाहा. आता सिंकमधील पाणी काढून टाका आणि साध्या स्क्रबर किंवा स्पंजने स्वच्छ करा. ही एक अत्यंत सोपी पद्धत आहे आणि त्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.