Kitchen Tips: किचनमधल्या चाकूची धार गेलीय, करा मग 'हे' उपाय

कधी कधी चाकूची धार गेल्यामुळे जेवण बनवताना कामाचा खोळंबा होतो.
kitchen hacks how to sharpening your knife home remedies
kitchen hacks how to sharpening your knife home remedies
Updated on

स्वयंपाक घरात चाकूचा वापर सतत होत असतो. भाज्या, फळं आणि इतर अनेक गोष्टी कापण्यासाठी, चिरण्यासाठी चाकू वापरला जातो. मात्र कधी कधी चाकूची धार गेल्यामुळे जेवण बनवताना कामाचा खोळंबा होतो. अनेक अडचणी निर्माण होतात. चाकूमुळे पटकन होणाऱ्या कामांना विलंब लागतो. तर तुम्हाला आज आम्ही चाकूला घरच्याघरी धार कशी करायची हे सांगणार आहोत.

kitchen hacks how to sharpening your knife home remedies
Kitchen Tips : रस्त्यावरील माठात होतं तसं थंडगार पाणी घरच्या माठात का होत नाही?

चाकूला धार देण्यासाठी कॉफीमगचा वापर करा

कॉफी मगच्या मदतीने तुम्ही चाकूला छान धार काढू शकता. कॉफीचा तळभाग हा खडबडीत असतो. त्या तळभागावर चाकू घासल्यास तुमच्या चाकूला चांगली धार येईल.

kitchen hacks how to sharpening your knife home remedies
Kitchen Tips: स्टफिंग पराठा बनवताना सारण बाहेर निघतं का? फॉलो करा 'या' टिप्स

पाटा वरवंटा

पाटा वरवंटा वापरून सुद्धा तुम्ही चाकूला धार लावू शकता. त्यासाठी पाटा किंवा वरवंटा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर चाकूच्या दोन्ही बाजू ५ मिनिटे यावर घासत रहा. त्याने देखील चाकूला छान धार लागते.

kitchen hacks how to sharpening your knife home remedies
Kitchen Tips : टिपिकल पदार्थांना अधिक स्वादिष्ट बनवायचंय तर या गोष्टी नक्की करा, जेवणाच्या टेबलावर होईल तुमचंच कौतुक

न्यूज पेपरच्या सहाय्याने सुरीला धार

न्यूज पेपरच्या सहाय्याने सुरीला धार काढता येते. यासाठी न्यूज पेपरच्या घड्या तयार करून घ्या. त्यावर सूरी घासा. सूरी घासल्यामुळे घर्षण होऊन सुरीला धार निघेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.