Kitchen Hacks : अशा पद्धतीने स्टोर करा हिरवे मटार, वर्षभर राहतील फ्रेश आणि हेल्दी...

मटारमध्ये कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन बी, फायबर, प्रोटीन देखील आढळते, जे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.
Kitchen Hacks
Kitchen Hackssakal
Updated on

मटार पौष्टिक असण्यासोबतच खायलाही खूप चविष्ट असते. यामध्ये कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन बी, फायबर, प्रोटीन देखील आढळते, जे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. मटार फक्त हिवाळ्यातच मिळतात, त्यामुळे हिवाळ्यानंतर आपण बाजारात उपलब्ध असणारे फ्रोझन मटारवर अवलंबून असतो. म्हणून मटार कसे स्टोर करायचे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

फ्रिजमध्ये मटार स्टोर करण्याच्या टिप्स

मटार फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये अनेक प्रकारे साठवले जाऊ शकतात. आम्ही तुम्हाला सोपे हॅक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने मटार बराच काळ ताजे राहतील. चला तर मग जाणून घेऊया मटार स्टोर करण्याचे उपाय.

Kitchen Hacks
Kitchen Hacks : हिरव्यागार मिरच्या लवकर खराब होतात, मग या पद्धतीने करा स्टोअर, दीर्घकाळ राहतील ताज्या

मोहरीचे तेल उपयुक्त ठरेल

मटार जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवायचे असल्यास मोहरीचे तेल वापरता येते. हे तुम्हाला थोडे विचित्र वाटेल, परंतु हे हॅक खूप उपयुक्त आहे. यासाठी सर्वप्रथम मटार वेगळे करा, म्हणजेच साल काढून टाका.

नंतर हाताला मोहरीचे तेल लावावे व नंतर मटारला देखील मोहरीचे तेल लावावे. काही काळ सुकण्यासाठी सोडा. आणि नंतर मटार फ्रीजरमध्ये जिपर बॅगमध्ये ठेवा.

मटार उकडवून स्टोर करा

मटार रेफ्रिजरेटरमध्ये बराच काळ ताजे ठेवण्यासाठी ते उकडवून स्टोर करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही. गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी उकळायला लागल्यावर त्यात मटार टाका आणि नीट कोरडे होऊ द्या.

मटारमध्ये ओलावा असल्यास ते साठवून ठेवण्याचा काही उपयोग होणार नाही. मटार नीट सुकल्यानंतर कॅरी बॅगमध्ये ठेवा आणि फ्रिजमध्ये स्टोर करा.

Related Stories

No stories found.