Kitchen Tips रोजच्या वापरामुळे Fry Pan काळं झालं असेल तर ‘या’ मॅजिकल ट्रीकने पुन्हा चमकू लागेल तवा

Kitchen Tips जर तुम्हाला फ्राय पॅन किंवा काळे झालेले नॉनस्टिक पॅन किंवा पॅन पुन्हा नव्या सारखे हवे असतील तर आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही कोणतेही जादा कष्ट न घेता तवे स्वच्छ करू शकता
Kitchen Tips चमकवा फ्राय पॅन
Kitchen Tips चमकवा फ्राय पॅनEsakal
Updated on

Kitchen मधली सर्व भांडी कायम चकचकीत आणि स्वच्छ दिसावी अशी सर्वांची इच्छा असते. मात्र रोजचा स्वयंपाक करून कालांतराने अनेक भांडी जुनी किंवा काळपट दिसू लागतात. खास करून विविध पदार्थ तळण्यासाठी वापरात येणारे फ्राय पॅन किंवा खोलगट तवे. Kitchen Hacks in Marathi how to clean burned frying pan

या भांड्यांचा विविध पदार्थ तळण्यासाठी Frying सतत वापर होत असल्याने ते आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने काळवंडतात. अशा फ्राय पॅनची बाहेरील बाजू अत्यंत काळी पडते, जी पुन्हा स्वच्छ Cleaning करणं हा अनेकांना कठिण टास्क वाटू लागतो. चिकट आणि काळे झालेले पॅन Kitchen Utensils स्वच्छ करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागेल असं अनेकांना वाटतं.

यासाठी मग स्क्रबरच्या मदतीने हे तवे किंवा पॅनवर मोठी मेहनत घेतली जाते. मात्र तरीही हे तवे काही स्वच्छ होत नाही.

मात्र जर तुम्हाला फ्राय पॅन किंवा काळे झालेले नॉनस्टिक पॅन किंवा पॅन पुन्हा नव्या सारखे हवे असतील तर आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही कोणतेही जादा कष्ट न घेता तवे स्वच्छ करू शकता.

फ्राय पॅन स्वछ करण्याची मॅजिकल ट्रीक

फ्राय पॅन किंवा तवा स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम तवा उलटा ठेवून तव्याच्या बुडावर १-२ चमचे मीठ पसरा

त्यानंतर यावर १-२ चमचे बेकिंग सोड्याची पावडर सर्वत्र टाका.

आता यावर १ चमचा लिक्विड डिटर्जंट सर्वत्र पसरवून टाका.

मीठ, बेकिंग सोडा आणि डिटर्जंट टाकून झाल्यावर यावर २-३ टिश्यू पेपर टाका.

आता टिश्यू पेपरवर वरून अर्धा कप व्हाइट व्हिनिगर टाका आणि तवा २० मिनिटांसाठी तसाच राहू द्या.

२० मिनिटांनी टिश्यू पेपर अलगद काढून घ्या आणि त्यानेच तवा नीट पुसा.

हे देखिल वाचा-

Kitchen Tips चमकवा फ्राय पॅन
Kitchen Hacks : कुकींगसाठी डॅमेज भांडी वापरू नका, वाढू शकतो हार्मोनल असंतुलनाचा धोका, स्वयंपाकासाठी ही भांडी बेस्ट

त्यानंतर एका स्क्रबरच्या मदतीने तवा हलक्या हाताने घासला तरी तो अगदी सहज स्वच्छ होईल आणि नव्या सारखा चमकू लागेल.

तसंच विविध पदार्थ तळल्यामुळे अनेकदा फ्राय पॅन किंवा कढई आतूनही चिकट होते. आतील बाजूने काळा थर साचतो. हा थर घासून काढताना काही वेळेस नॉनस्टिक पॅन किंवा कढई खराब होवू शकते. यासाठी देखील तुम्ही घरीच एक सोल्यूशन तयार करून कढई स्वच्छ करू शकता.

कढई किंवा पॅन आतून स्वच्छ करण्यासाठी एका वाडग्यात २ चमचे सोडा आणि १ चमचा विनेगर घेऊन पेस्ट तयार करा.

ही पेस्ट कढई किंवा पॅनला आतून बाजूने सर्वत्र लावा आणि १० मिनिटांसाठी राहू द्या.

त्यानंतर एका स्क्रबरवर लिक्विड डिटर्जंट घेऊन कढई आतून हलक्या हाताने स्वच्छ करा.

यामुळे कढईच्या आतील चिकटपणा, तेलकटपणा दूर होईल.

अशा प्रकारे काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही घरीच काळवंडलेले फ्राय पॅन किंवा कढई स्वच्छ करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.