स्वयंपाकघरातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गॅस शेगडी. त्याशिवाय स्वयंपाक करणे कठीण आहे. गॅस शेग वापरण्याची एक वेगळी पद्धत आहे, ज्याची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काळजी घ्यावी लागते. सिलिंडर वापरात नसताना अनेकजण गॅस शेगडी बंद करतात.
काही लोक गॅस पेटवण्यासाठी लायटर वापरतात, तर काहीजण काडेपेटीने गॅसची शेगडी चालू करतात. गॅस शेगडी चालू किंवा बंद करण्याच्या अनेक पद्धती थेट सुरक्षिततेशी संबंधित आहेत.
चालू करताना, तुम्ही नकळत काही चुका करू शकता ज्यामुळे तुमच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. स शेगडी चालू करण्याचा योग्य मार्ग आणि स्वयंपाकघरातील सुरक्षितता टिप्स जाणून घेऊया.
सेफ्टी टिप्स
जर तुम्ही काडेपेटीच्या मदतीने गॅस ऑन करत असाल तर आधी काडीपेटी पेटवावी त्यानंतर गॅस ऑन करावा. अनेकजण काडेपेटी पेटवण्याआधीच गॅस ऑन करतात. यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडतो. यामुळे तुमचा हात जळण्याची शक्यात असते.
काडेपेटीने जर गॅस पेटवणं शक्य झालं नाही तर लगेचच गॅस बंद करून काडेपेटी विझवावी. शिवाय दोन मिनिटं थांबून नंतरच पुन्हा गॅस पेटवण्याचा प्रयत्न करावा.
माचिस एवजी कायम लायटरने गॅस पेटवण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे जोखीम कमी होते.
गॅस पेटवण्यासाठी त्याची सेटिंग कमी असावी म्हणजेच गॅस लोवर ठेवून माचिस किंवा लायटरने तो सुरु करावा. त्यानंतर तुमच्या हिशोबाने तुम्ही हाय, मीडियम फ्लेम करू शकता.
यासोबतच अनेकदा गॅस नियमितपणे वापरला जात असल्याने त्याचे बर्नर खराब होतात. या बर्नरमध्ये कार्बन किंवा अन्नाचे कण साचल्याने नळीतून येणारा LPG योग्य रित्या बर्नरपर्यंत पोहतच नाही. बऱ्याचदा गॅस लिक झाल्याचा वासही येतो. यामुळे देखील मोठा धोका निर्माण होवू शकतो. यासाठीच बर्नर वेळोवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे.
बर्नरमधून गॅस पास होण्यास अडचण होत असेल तर लगेचच तो बदलण्याची आवश्यकता नाही सुरुवातीला तुम्ही काही ट्रीक वापरून घरच्या घरी बर्नर स्वच्छ करु शकता.
विनेगरने करा बर्नर स्वच्छ- यासाठी एका वाडग्यात अर्धा कप विनेगर आणि दोन चमचे मीठ घ्या. हे मिश्रण बर्नरवर टाका. त्यानंतर हे बर्नर तुम्ही १०-१५ मिनिटांसाठी या मिश्रणातच बुडवून ठेवू शकता. त्यानंतर बर्नर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे बर्नर नव्या प्रमाणे चमकू लागतील, लक्षात घ्या बर्नर पूर्ण वाळल्यानंतर पुन्हा बसवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.