Kitchen Hacks : खरं की काय! मीठ सुद्धा होतं एक्सपायर; मीठ खराब होऊ नये म्हणून साठवणूक कशी करावी?

Salt have an expiry date : होय नक्कीच, जसे प्रत्येक पदार्थ ताजा असतो तसं मीठही ताजं असतं. पण, काही दिवसांनी ते सुद्धा कालबाह्य होतं.
Kitchen Hacks
Kitchen Hacksesakal
Updated on

Salt have an expiry date :

किचनमधील प्रत्येक पदार्थाची एक वेगळी खासियत आहे. प्रत्येक पदार्थ वेगळा आहे. मग ते मसाले असो वा कडधान्य, किंवा मीठ. प्रत्येक पदार्थाचा आपला एक गुणधर्म आहे. प्रत्येक पदार्थात आपण मसाले टाकत नाही. पण, मीठाशिवाय कुठलाच पदार्थ पूर्णही होत नाही.

मीठ नसेल जेवणात तर चव येत नाही. त्यामुळे काही लोक वरुन मीठ घेऊन खातात. पण, मीठ खाण्याचे दुष्परिणाम देखील आहेत. तुम्ही खात असलेलं हे मीठ शुद्ध असेल. पण, त्याची एक्स्पायरी डेट तुम्ही तपासली आहे का?

Kitchen Hacks
Philip Salt KKR vs RCB : 6,0,6,6,W,1W कर्ण शर्मानं चोपलं! अखेर सॉल्टनं सर्वात महागड्या खेळाडूची वाचवली लाज; पाहा VIDEO

मीठ एक्सपायर होत का?

होय नक्कीच, जसे प्रत्येक पदार्थ ताजा असतो तसं मीठही ताजं असतं. पण, काही दिवसांनी ते सुद्धा कालबाह्य होतं. कारण, मीठ हा सुद्धा एक पदार्थ आहे. त्यामुळे तो ही कधी ना कधी एक्सपायर होत असेल.  

मीठ एक्सपायर झालंय हे कसं ओळखावं

मीठ उघड्यावर ठेवलेले असले तर त्याला पाणी सुटतं. पण, कधी कधी मीठ हवाबंद डब्यात असलं तरी देखील त्याला पाणी सुटू शकतं. पाणी सुटलेलं ओलं चिपचिपीत झालेलं मीठ असेल तर समजा की ते कालबाह्य झालं आहे. म्हणजे ते वापरणे तुमच्यासाठी धोक्याचे ठरु शकते.

Kitchen Hacks
Salt In Daily Diet: रोज आहारात किती मीठ असावं? जाणून घ्या तुमच्यासाठी कोणतं मीठ ठरेल बेस्ट

मीठाचा रंग बदलला आहे का?

मीठाचा रंग पांढरा असतो हे लहान मुलांनाही माहितीय. अशावेळी जर तुमच्या किचनमधील मीठ खराब झाले असेल तर त्याचा रंग बदलतो. मीठाचा रंग काळपट पडला असेल तर ते खराब झाले आहे.

मीठाची चव बदलली आहे का?

तुम्हाला मीठ चाखूनही ते खराब आहे की चांगले हे ठरवता येते. मिठाची चव खारट असते. पण तुमच्या घरातील मीठ कडवट लागत असेल. तर, मात्र मीठ खराब झाले आहे असे समजावे.

Kitchen Hacks
Salt Controversy : देश गुजरातचं मीठ खातोय; पण उपवासाचं मीठ तर पाकीस्तानातून येतंय!

पावसाळ्यात मिठाची अशी करा साठवणूक, खराब होणार नाही

  • पावसाळ्यात ओलाव्यापासून मिठाला दूर ठेवा.

  • मीठ घेण्यासाठी नेहमी कोरड्या चमच्यांचा वापर करा

  • मीठ ओल्या हातांनी घेऊ नका

  • मिठात गाठी झाल्या असतील तर त्या कोरड्या चमच्याने फोडा.

  • मीठ साठवण्यासाठी हवाबंद डब्यांचा वापर करा   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.