Utensils Cleaning Tips: चैत्र महिन्यात मराठी नववर्षाचे स्वागत केले जाते. या बरोबरच सण, समारंभांना देखील सुरूवात होते. संपूर्ण देशात चैत्राचा महिना पवित्र मानला जातो. त्यामूळे सध्या सगळीकडे गणपती बाप्पासाठी केलेले डेकोरेश उतरवण्याची लगभग सुरू झाली आहे.(When and How Often to Clean Pooja Items at Home)
देव पूजेसाठी वापरलेल्या पूजेच्या भांड्यांची साफ-सफाई केली जात आहे. यामध्ये तांब्याची, पितळेची भांडी, दिवे, समई, ताट, ताम्हण यांना चकचकीत करण्यासाठी अनेकजण पितांबरीचा वापर करतात. परंतु यामुळे भांडी साफ करूनही पुन्हा काळपट दिसू लागतात. अशावेळी तुम्ही पितांबरी ऐवजी आम्ही दिलेल्या नवीन टिप्स नक्की ट्राय करा..
तांब्या, पितळेची भांडी चकचकीत करण्यासाठी टिप्स
चिंच, लिंबू आणि मीठ
तुम्ही चिंच, लिंबू आणि मीठाचा वापर करू शकता. गॅसवर मोठ्या भांड्यात पाणी गरम करा. त्यामध्ये चिंच, लिंबाचा रस आणि मीठ घाला. या सर्व मिश्रणात तांब्या, पितळेची भांडी घाला आणि ती उकळून घ्या. या उपायाने भांडी लख्ख निघतील.
वॉशिंग पावडर
एका मोठ्या भांड्यात पाणी उकळून घ्या. या पाण्यात वॉशिंग पावडर घाला. गॅस बंद करून यात हळद घाला. या मिश्रणात पितळेची भांडी थोडावेळ भिजत ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने भांडी धुवून घ्या.
टोमॅटो केचअप
तांब्याची भांडी साफ करण्यासाठी आपण टोमॅटो केचपचा हि वापर करू शकता. टोमॅटो केचपमध्ये असणाऱ्या आम्लामुळे भांडी स्वच्छ निघतात. भांड्यावर केचअप लावून भांडी ठेवा. 5 ते 10 मिनिटानंतर भांड्यावरून हलक्या हाताने घासणी फिरवली तरी भांडे स्वच्छ होते.
लिंबू
एक चमचा लिंबाचा रस, डिटर्जंट पावडर आणि एक चमचा व्हिनेगर घालून ही भांडी स्वच्छ केल्यास तांब्याच्या भांड्यांवरील डाग नाहीसे होऊन भांडी लख्ख चमकतील.फक्त लिंबाच्या वापराने सुद्धा करू शकता. अर्धा लिंबू कापून त्याने भांडी घासा. काही वेळानंतर भांड्यावरील डाग नाहीसा होईल.
व्हिनेगर
यासाठी तुम्हाला फक्त 1 ग्लास पाण्यात दोन चमचे व्हिनेगर उकळावे लागेल. नंतर त्यात साबण टाकून भांडी धुवा. असे केल्याने पूजेच्या भांड्यांमध्ये मूळ चमक परत येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.