Kitchen Tips : पाहुणे आलेत आणि घरातले लिंबू संपलेत, अशावेळी काय कराल?

लिंबू नसतानाही सरबत कसा कराल?
Kitchen tips
Kitchen tips esakal
Updated on

भर दुपारचं तुमची झोप मोड करत पाहुणे घराची बेल वाजवतात. तुम्ही दार उघडून त्यांचं स्वागत करता. उन्हाने ही लाही झालेल्या पाहुण्यांना तुम्ही थंड पाणी देता. थोड्यावेळाने पाहुण्यांचीच फर्माईश येते की,वहिनी थंडगार लिंबू सरबत करा.

तुम्हीही हसून हो आणते म्हणून आत येता आणि सरबतासाठी पाणी, वेलची पूड, साखर घेता. शेवटी लिंबू घ्यायला फ्रीज उघडता आणि लक्षात येत की लिंबू संपले आहेत. आता काय करायचं हे कोड पडलेलं असत.

अशावेळी शेजाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांची झोपमोड करणं योग्य नसत त्यामुळं तुमच्याकडे काही पर्याय नसतो. अशी वेळ प्रत्येकावर येते. त्यावेळी काही ट्रिक वापरून लिंबू सरबतच्या चवीच सरबत तुम्ही बनवू शकता, कसे ते पाहूया

Kitchen tips
Vastu Tips for Kitchen : या दिशेने असावी नेहमी किचनमधील चुल नाहीतर पैसा टिकणार नाही अन् व्हाल गरीब

संत्री

लिंबू आणि संत्री ही एकच गटात असलेली फळ. संत्री जास्त पिकलं की ते गुळचट चवीला लागत. आणि कच्चं असेल तर ते लिंबू सारखच लागत. त्यामुळे घरी लिंबू नसेल तर त्याऐवजी संत्र्याचा वापर करता येतो.

लिंबूला भन्नाट पर्याय
लिंबूला भन्नाट पर्यायesakal
Kitchen tips
Kitchen Tips : शिट्टी झाली की कुकरमधलं सगळं पाणी बाहेर येतंय? ट्राय करा मास्टरशेफ पंकजचा हा हॅक

लिंबूचे सिरप

बाजारात जसे कोकमचे सिरप मिळते. तसेच लिंबाचेही सिरप असते. ते आणून ठेवा. जेणेकरून लिंबू नसतानाही पाहुण्यांना नाराज न करता लिंबू सरबत देता येईल.

लेमन सिरप
लेमन सिरपesakal
Kitchen tips
Kitchen Tips : स्वयंपाकघरातला LPG गॅस कसा वाचवाल ?

व्हाईट व्हिनेगर

लिंबूच्या ऐवजी व्हाईट व्हिनेगरही तूम्ही सरबतामध्ये वापरू शकता. त्यालाही लिंबासारखीच चव असल्याने सरबताला वेगळी चव येईल.व्हिनेगर स्टोअर करणे सोपे असल्याने ते तूम्ही उन्हाळ्याच्या सुरूवातीला घेऊन येऊ शकता.

Kitchen tips
Kitchen Tips : काळीकुट्ट झालेली अॅल्युमिनिअमची कढई कशी चमकवाल ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.