Kitchen Tips : ही ट्रिक वापराल तर पाच तासात लागेल दही, फक्त या चूका करू नका

दही लावण्यासाठी उबदार वातावरण आवश्यक असते
Kitchen Tips
Kitchen Tipsesakal
Updated on

Kitchen Tips :

मटणाचं ताटात सोलकढीनेही सजवले असेल तर सोबतीला दही कांदा नसेल तर एखाद्याला जेवल्यासारखेच वाटणार नाही. केवळ मटणाचं ताट नाहीतर उपवासाच्या खिचडीतही दही,ताकाशिवाय उपवास केल्यासारखा वाटणार नाही. दही, ताक खाण्याचे अनेक फायदे आहेत.  पण घरच्याच दह्याला जास्त चव असते. त्यामुळे घरच्याच विरझनाचं दही आवडीने खाऊ वाटतं. विकतच दही केवळ पाणीदार अन् आंबट असतं.

दही भारतीय स्वयंपाकघरात वारंवार वापरले जाते. अनेक खाद्यपदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. भाजी बनवणे असो, किंवा त्वचा आणि केसांची काळजी घेणे असो त्यात दही नक्कीच वापरले जाते. मात्र, हिवाळ्यात दही बनवणे इतके सोपे नसते. दही लावण्यासाठी उबदार वातावरण आवश्यक असते.  

Kitchen Tips
Garlic Kitchen Hacks : सोललेला लसूण महिनाभर खराब होणार नाही, स्टोर करण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

पण हिवाळ्याच्या हंगामात दही सेट करताना सगळ्यांनाच अडचण येते, जर दही सेट करायला जास्त वेळ लागला तर त्याची चवही बिघडू लागते. आणि त्याचा दाटसरपणा येत नाही. या काही सोप्या पद्धती आहेत ज्या दही बनवण्यास मदत करू शकतात.

कमी वेळात दही लावण्यासाठी या टिप्स वापरा

  • एक लिटर फुल क्रीम दूध घ्या आणि चांगले उकळवा. दूध उकळल्यानंतर ते थोडे थंड होऊ द्या. ते कोमट ठेवावे. हे लक्षात ठेवा की ते जास्त गरम किंवा खूप थंड नसावे.

  • नेहमी ताजे आंबट दही घेण्याचा प्रयत्न करा.

  • त्यानंतर स्वच्छ भांड्यात दूध टाका. आणि त्यात थोडे ताज्या दह्याचे विरझन टाका.

Kitchen Tips
Kitchen Hacks : सिझन संपला तरी मटार संपणार नाहीत, ही सोप्पी पद्धत वापरून घरीच बनवा Green Peace

दही लावताना ही चूक करू नका.

  1. गरम दुधात दही मिसळून कधीही दही लावू नका.

  2. दह्याचा डबा नेहमी उघडा ठेवू नका.

  3. दही लावताना लक्षात ठेवा की दूध जास्त गरम किंवा थंडही असू नये.

  4. ज्या भांड्यात तुम्ही दही गोठवत आहात ते सुरक्षित ठिकाणी ठेवा, जिथे ते हलणार नाही.

  5. घरी दही सेट करण्यासाठी तुम्हाला ते उबदार ठिकाणी ठेवावे लागेल.

  6. ज्या भांड्यात तुम्ही दूध उकळले आहे त्याच भांड्यात दही ठेवू नका.

  7. घट्ट दही हवे असेल तर साय असलेले दूध वापरा.

Kitchen Tips
Kitchen Hacks : हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खराब होण्याचे टेन्शन सोडा; ताज्या ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()