Kitchen Tips : मसाले स्टोअर करण्याची योग्य पद्धत शिकून घ्या, वर्षानुवर्षे टिकेल त्यांचा घमघमाट!

मसाले लाकडी कि प्लास्टीक कोणत्या डब्यात ठेवावेत?
Kitchen Tips
Kitchen Tipsesakal
Updated on

Kitchen Tips : मनुष्य आदिमानव काळात जगत होता तेव्हा तो केवळ एखादा प्राणी कोणताही मसाला न वापरता फ्राय करून खात होता. मग हळूहळू त्याची प्रगती झाली आणि त्याला खाण्यापिण्याच्या गोष्टी कळू लागल्या.

तेव्हा तिखट आणि मीठ या दोनच गोष्टी टाकून भाजी बनवली जायची. आजही काही लोकांना तसेच खायला आवडते. पण आता कोणत्याही भाजीला चवदार बनवतात ते आपल्या किचनमधील मसाले. 

चांगला चवीचा स्वयंपाक बनवायचा असेल तर त्यासाठी उत्तम पद्धतीचे मसाले वापरले जातात. आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक मसाले असतात, ज्याचा वापर आपण जेवणाची चव वाढवण्यासाठी करतो.

Kitchen Tips
Kitchen Vastu Tips: स्वयंपाक घराची योग्य जागा कोणती? स्वयंपाक करताना कोणते नियम पाळावेत?

शिवाय हे मसाले आरोग्य निरोगी ठेवण्यासही मदत करतात. त्यांचा वास उडू नये म्हणून आम्ही मसाले वेगळ्या डब्यात साठवून ठेवतो. अनेकदा असं होतं की आपण काही मसाले नीट साठवून ठेवतो, पण काही दिवसांतच त्याचा सुगंध नाहीसा होतो.

ज्यामुळे बनवलेला पदार्थ चवदार होत नाही. अनेकदा लवंग, वेलची वगैरे नीट साठवून ठेवली नाही तर त्याचा सुगंध ओसरतो. आज आम्ही तुम्हाला हे मसाले साठवून ठेवण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत, जेणेकरून मसाल्यांचा सुगंध बराच काळ शाबूत राहील.

हवाबंद डब्यात ठेवा

मसाले नेहमी हवाबंद डब्यातच ठेवावेत. कारण हवा लागली की मसाले मऊ पडतात अन् त्यामध्ये जाळी निर्माण होते.  त्यामुळे ते एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवून त्याचे झाकण चांगले ठेवावे. यामुळे त्याचा सुगंध दीर्घकाळ टिकून राहील. (Kitchen Tips)

Kitchen Tips
Kitchen Vastu Tips: घरात स्वयंपाकघर बनवताना दिशा महत्वाची, या 4 गोष्टींची घ्या काळजी

मसाले दूर ठेवा

काहीवेळा पटकन हाताला यावेत यासाठी गॅसच्या जवळ ठेवले जातात. पण तुम्हीही ही चूक करू नका. गॅसजवळ कधीही ठेवू नका. किचन कॅबिनेटच्या आत अंधाऱ्या जागी ठेवा. यामुळे मसाले जास्त काळ टिकतील आणि त्यांचा सुगंध टिकून राहील.

मसाले फ्रिजमध्ये ठेऊ नका

मसाले फ्रिजमध्ये ठेवले तर ते चांगले राहतात, असे अनेक गृहिणींचे मत आहे. पण, त्यात काहीच तथ्य नाही. मसाले कधीही फ्रिजमध्ये ठेवू नयेत. फ्रिजमध्ये ठेवल्याने ते खराब होतात आणि फार काळ टिकत नाहीत.

Kitchen Tips
Kitchen Tips: सुकलेली लिंब फेकून देताय तर थांबा, किचनमध्ये असा करा वापर

मसाले कशात साठवावे

सध्या प्लास्टिकचे आकर्षक डबे मिळतात. ज्यात मसालेच नाहीतर अनेक गोष्टी साठवल्या जातात.पण, मसाले साठवण्यासाठी प्लास्टिकच्या डब्यांचा वापर अजिबात करू नका. मसाले नेहमी काचेच्या जारमध्ये ठेवा. यामुळे ते बराच काळ चांगले राहतात.

मसाल्यात मीठ टाका

तुम्ही खडे मसाले चांगले रहावेत म्हणून त्यात मोठे मीठ टाकू शकता. मीठ गोष्टी स्टोअर करण्यासाठी वापरले जाते. मसाल्यात मीठाचे खडे टाकले तर ते लवकर खराब होत नाहीत. फक्त लक्षात ठेवा की, पावसाळ्यात त्यात मीठ घालू नये. (Salt)

मसाले नेहमी काचेच्या जारमध्ये ठेवा
मसाले नेहमी काचेच्या जारमध्ये ठेवाesakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.