Kitchen Tips : स्वयंपाक बनवायला जातो खूप वेळ, 'या' ट्रिक्स वापराल तर मिनिटात होईल जेवण

तुम्हाला स्वयंपाक करण्याची घाई असेल, तर काही टिप्स फॉलो करा
Kitchen tips for quick and good cooking
Kitchen tips for quick and good cooking
Updated on

अनेकदा महिला वर्गाचा स्वयंपाक करताना गोंधळ उडतो. मग ती महिला जॉब करणारी असो वा संपूर्ण घर सांभाळणारी असो. घाईत नेमका स्वयंपाक काय करावा हेच समजत नाही. घाईगडबडीत काही बेसिक गोष्टीसुद्धा विसरुन जातात. मग त्याचे परिणाम पदार्थाच्या चवीत उतरतात. कधी मीठ कमी पडलेलं असत तर कधी फोडणी करपलेली असते. हे असं काही तुमच्या एकट्याच्याबाबतीत घडत असं नाही. प्रत्येक गृहिनीचा असा गोधळ हा उडतोच. पण टेन्शन घेऊ नका. असा गोधळ उडू नये म्हणून काही बेसिक टिप्स तुमच्यासाठी आणल्या आहेत...

  • भात लवकर होण्यासाठी पहिल्यांदा कुकरमध्ये 1 चमचा तूप किंवा तेल टाकून गरम करा. त्यात पाणी आणि चिमूटभर मीठ घालून उकळून घ्या आणि नंतर तांदूळ घालून 2 शिट्ट्या शिजवा. भात शिजला जाईल आणि चिकटणार नाही.

  • कोणताही पदार्थ करण्यापूर्वी भांड्यामध्ये काही मिनीट आधी तेल गरम करायला ठेवा. त्यामुळे पटकन फोडणी टाकण्यास मदत होते. तसेच चपातीचं देखील आहे. चपाती करण्यापूर्वी तुम्ही जर तवा गॅसवर आधी चांगला तापवलात तर चपात्या पटकन होण्यास मदत होते.

  • स्वयंपाक करताना पाणी लागणार असले तर पाणी उकळून मोठ्या भांड्यात ठेवावे. जेव्हा गरज असेल तेव्हा वापरा. त्यामुळे भाजी शिजण्यास आणि आमटी लवकर उकळण्यास मदत होते.

  • सुट्टीच्या दिवशी आलं लसणाची पेस्ट करुन ठेवा. जेणेकरुन घाईत स्वयंपाक करताना आलं लसून ठेचत बसण्याची वेळ येणार नाही. तसेच जर तुम्हाला खलबत्यात आलं लसून ठेचायचं असेल तर त्यामध्ये थोड मीठ घाला जेणेकरुन पटकन ठेचून निघेल.

Kitchen tips for quick and good cooking
Kitchen Tips : रस्त्यावरील माठात होतं तसं थंडगार पाणी घरच्या माठात का होत नाही?
  • तुम्हाला जर पटकन डाळीची आमटी करायची असेल तर प्रेशर कुकरमध्ये डाळीसोबत टोमॅटो आणि इतर मसाल्यांसोबत शिट्ट्या करा. शिट्ट्या होईपर्यंत फोडणी तयार करुन घ्या.

Kitchen tips for quick and good cooking
Kitchen Tips : ही ट्रिक वापराल तर पाच तासात लागेल दही, फक्त या चूका करू नका
  • आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी पालेभाज्या निवडून ठेवणे, लसूण सोलून ठेवणे, गवार, पापडी यांसारख्या भाज्या निवडून ठेवल्यास झटपट भाजी टाकता येते. तसेच, ऐनवेळी खोबरे वाटत बसल्यास खूप वेळ जातो. त्यापेक्षा सुट्टीच्या दिवशी खोबरे वाटून ठेवावे.

  • कडीपत्ता, कोथिंबीर निवडून ठेवणे, धनेजीरे पूड आधीच करुन ठेवणे, तसेच गरम मसाला तयार करुन ठेवणे गोष्टींची तयारी आधीच करुन ठेवल्यास स्वयंपाकाचा वेळ वाचेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.