Kitchen Tips : घरात उंदरांचा सुळसुळाट झाला तर हे उपाय नक्की करा, उंदीर बॅग घेऊन बाहेर पडतील

Rat Kills Remedies : पूर्वीच्या काळी घरात असलेले उंदीर ही शुभ लक्षण मानलं जात होतं. कारण ज्याच्या घरात धान्य जास्त त्याच्या घरात उंदीरही जास्त अशी मान्यता होती.
Rat Kills Remedies
Rat Kills Remedies esakal
Updated on

Rat Kills Remedies :

आपल्या घरात किडे, मुंग्या, माशा यांच्यासोबतच उंदीर सुद्धा राहत असतात. ते आपल्या घरातील अन्नधान्याची नासधूस करतात. तर काही वेळा उंदीर कुठेही मरून पडतो त्यामुळे डोक्याला ताप होतो. पूर्वीच्या काळी घरात असलेले उंदीर ही शुभ लक्षण मानलं जात होतं. कारण ज्याच्या घरात धान्य जास्त त्याच्या घरात उंदीरही जास्त अशी मान्यता होती.

पण आता हे उंदीर केवळ धान्याचे नाही तर आपले कपड्यांचे सुद्धा नुकसान करतात. जेव्हा आपण घर झाडायला काढतो तेव्हा हा सगळा कचरा पाहून अस्वस्थ व्हायला होत. त्यामुळे घरातून उंदरांना बाहेर काढण्याचे उपाय पाहूयात.  

Rat Kills Remedies
Kitchen Tips : बघेल तिकडे मुंग्यांचा ढिगारा, तर या टिप्स वापरा, मुंग्या घरात पाऊल टाकणार नाहीत!

काही लोक उंदरांसोबतच राहतात. तर काही लोक उंदरांसाठी पिंजरा ठेवतात. त्यातील उंदीर ते दूर होऊन सोडतात. किंवा काही लोक उंदरांसाठी औषधही ठेवतात. पण तुम्ही यातलं काहीच करू नका. तुम्ही घरात काही छोटे छोटे उपाय केल्याने उंदीर स्वतःच त्यांची बॅग घेऊन घरातून निघून जातील. आणि पुन्हा ते तुमच्या घरात येण्याचा विचार सुद्धा करणार नाहीत.

कांदा

तुमच्या पदार्थाची चव वाढवणारा कांदा तुम्हाला उंदीर पळवून लावण्यात मदत करेल. उंदीर मामा बाप्पाचे आवडते असले तरी ते आपलं नुकसान करतात त्यामुळे त्यांना घराबाहेर काढणं गरजेचे आहे. उंदीर कधीच कांद्याची नासधूस करत नाहीत.

कारण त्यांनाही कांद्याचा वास आवडत नाही. तुमच्या घरात जास्त उंदीर झाले असतील. तर तुम्ही घरात कोपऱ्या कोपऱ्यावर कांदा कापून ठेवावा. जिथे उंदीर रात्रभर फिरत असतात तेथेही तुम्ही जर कांदा पसरवला तर त्याच्या वासाने उंदरांची संख्या कमी होईल.  

Rat Kills Remedies
Kitchen Tips : स्वयंपाक बनवायला जातो खूप वेळ, 'या' ट्रिक्स वापराल तर मिनिटात होईल जेवण

लसूण

उंदरांना पळवण्यासाठी अनेक उपाय करून दमला असाल तर घरातील लसूण वापरून पहा. आमटी आणि भाज्या चविष्ट बनवणाऱ्या लसूण तुम्हाला उंदीर पळवून लावण्यात फायदेशीर ठरेल. यासाठी लसणाची पेस्ट करून घ्या आणि ती थोड्या पाण्यात मिक्स करून एकच स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या. जिथे उंदीर जास्त असतात तिथे हा स्प्रे पवारा. तुम्ही भरभर हा स्प्रे फवारलात तर तुम्हाला फायदाच होईल.

लवंग

मसालेभातात आलेली लवंग तुम्ही अलगद उचलून बाजूला करत असाल. तेवढाच तुम्ही त्याचा वापर करतात. पण उंदीर मामाला पळवून लावण्यातही लवंग मदत करते. जर तुम्हाला घरातील उंदरांची संख्या कमी करायची असेल तर तुम्ही एका कापडात काही लवंगा बांधून ठेवा किंवा तुम्ही उंदीर असलेल्या ठिकाणी लवंग तेल शिंपडा. त्या वासाने उंदीर घरातून पळून जातात.

Rat Kills Remedies
Kitchen Tips : करपून काळाकुट्ट झालेला कुकर चुटकीसरशी करा स्वच्छ; या उपयांनी कुकर चमकेल नव्यासारखा!

मिरची

उंदरांपासून बचाव करण्यासाठी मिरची हा रामबाण उपाय आहे. लाल मिरची बारीक करून घ्या आणि नंतर मिरचीच्या बिया घ्या आणि पाण्यात मिसळा. हे पाणी उकळून घ्या. पाणी थंड झाल्यावर ते गाळून स्प्रे बाटलीत भरावे. हा स्प्रे उंदरांवर फवारल्यास उंदरांच्या अंगावर जळजळ होऊ लागते. हे पाणी उंदीर मारण्यासाठी प्रभावी आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.