Kitchen Tips : किचन सिंकवरील चिवट डाग निघतच नाहीत? ही ट्रिक करेल मदत!

किचन सिंक चमकवणाऱ्या ‘या’ ट्रिकपुढे सिंक क्लिनरही झाला फेल
How to Clean Steel Sink at Home
How to Clean Steel Sink at Home esakal
Updated on

खरकटी भांडी स्वच्छ करणं जितकं गरजेचं आहे. त्याहुन जास्त गरज आपल्या किचनमधील सिंक साफ करण्याची आहे. पुर्वीच्या काळात भांडी अंगणात धुतली जायची. त्यामुळं सांडपाण्याचा निचरा व्हायचा. पण, आता सिंकमध्ये भांडी धुतल्याने ते घाण होतं. त्यात अन्न साचून राहतं.

स्वयंपाकघरातील सिंक साफ करणे खूप गरजेचे आहे. कारण सिंक घाण असेल तर संपूर्ण स्वयंपाकघर अस्वच्छ दिसते. स्टेनलेस स्टीलच्या किचन सिंकची साफसफाई करणे हे एक कठीण काम आहे. जर तुम्हाला तुमचा सिंक कायमस्वरूपी स्वच्छ आणि डागमुक्त ठेवायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता असेल ज्या घरी सहज उपलब्ध आहेत.

How to Clean Steel Sink at Home
Vastu Tips for Kitchen : या दिशेने असावी नेहमी किचनमधील चुल नाहीतर पैसा टिकणार नाही अन् व्हाल गरीब

आज आम्ही तुम्हाला सांगतो की स्टेनलेस स्टीलचे सिंक साफ करण्यासाठी तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही क्लिनरची गरज भासणार नाही. तुम्ही सिंक अगदी सहज स्वच्छ करू शकता.

यासाठी कोणत्याही क्लिनरची गरज भासणार नाही
यासाठी कोणत्याही क्लिनरची गरज भासणार नाहीesakal
How to Clean Steel Sink at Home
Kitchen Hacks: हो...चिरल्यानंतरही आपण फळे फ्रेश ठेवू शकतो

सिंक नेहमी रिकामे ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वयंपाकादरम्यान आणि नंतर वापरलेले भांडे ताबडतोब स्वच्छ करा. अनेकजणांच्या सिंकमध्ये तासं-तास भांडी पडेलेली असतात. किचनमधले सिंक दररोज स्वच्छ ठेवण्याचा तुम्ही निश्चय करायला हवा. भांडी धुतल्यानंतर वेळोवेळी सिंक स्वच्छ करणं आवश्यक आहे.

प्रत्येकवेळी सिंक वापरल्यानंतर बेकिंग सोडा आणि पाण्याने सिंक स्वच्छ करा. सिंक स्वच्छ करण्यासाठी नेहमी मऊ आणि नायलॉनमधील ब्रश वापरा. जर बेकिंग सोड्याचे घट्ट बनला असेल तर पाण्यात टाकून त्याला थोडा पातळ बनवा मग तो वापरा.

सिंकमधील जंतू जाण्यासाठी टिश्यू पेपरवर व्हाईट व्हिनेगर घाला आणि सिंक पुसून घ्या. स्टीलचा सिंक साफ करण्यासाठी सर्वात आधी सिंक रिकामे करा. नंतर सिंकमध्ये अडकलेली घाण काढून टाका. कारण यामुळे सिंक साफ करणे तुमच्यासाठी सोपे होईल.

How to Clean Steel Sink at Home
Kitchen Hacks : अशाप्रकारे स्वच्छता केल्यास वर्षानुवर्षे टिकेल नॉन-स्टीक पॅन

या स्टेप्सने करा सिंक स्वच्छ

- मऊ कापडावर थोडे ऑलिव्ह तेल लावा.

- या कापडाने सिंक आणि नळ पूर्णपणे स्वच्छ धुवा.

- स्प्रेच्या बाटलीत कोमट पाणी भरून सिंकवर आणि नळावर फवारा.

- त्यानंतर ते पाणी कॉटनच्या कोरड्या कापडाने पुसून घ्या.

How to Clean Steel Sink at Home
Kitchen Hacks | पराठे मऊ राहावेत असं वाटतंय? या ट्रिक्स करा फॉलो

या चुका टाळा

  • सिंक नवीन दिसण्यासाठी नेहमी रबर मॅट वापरा.

  • सिंक नवा दिसण्यासाठी तारेचा ब्रश वापरू नका. यामुळे स्टीलवर ओरखडे उडू शकतात.

  • सिंकवर जास्त वेळासाठी भांडी साचू देऊ नका. यामुळे सिंक गंजू शकतो.  

  • सिंक धुतल्यानंतर त्यावरील पाणी कापडाने नीच टिपून घ्या. नाहीतर त्यावर डाग पडतात.

  • सिंकमधील नळाची वेळचेवर दुरूस्ती करा.

  • नळ गळत असेल तर पाण्यामुळे सिंक खराब होऊ शकतो

  • सिंकची पाण्याची पाईप वरचेवर काढून स्वच्छ करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.