Summer Tips :
कडक उन्हाच्या झळा बसायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे फ्रिजमध्ये आणि माठात पाणी साठवलं जात आहे. रस्त्यावर,रिक्षा स्टॉप, चौकातही मातीचे माठ भरून ठेवले जात आहेत. रस्त्यावर उन्हात असलेल्या या माठातील पाणी कधीही पिले तर थंडगारच असते. पण, तसे थंड पाणी घरात असलेल्या माठात होत नाही.
घरी असलेल्या माठात थंड पाणी होत नाही, असा अनुभव प्रत्येकाचाच असेल. त्यामुळे माठ असूनही फ्रिजमधील अतिथंड पाणी प्यावे लागते. पण सतत फ्रिजमधील पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं.
त्यामुळे तुम्ही माठ निवडताना, माठ स्वच्छ करताना काही युक्त्या वापरल्या तर घरातील माठातही तुम्हाला थंडगार पाणी मिळेल. (Kitchen Tips)
माठ खरेदी करताना
नवा माठ खरेदी करणार असाल तर तो शक्यतो दिवसा खरेदी करा. कारण, खरेदी करताना दुपारच्या वेळी माठ उचलून पाहिला तर त्यात असलेलं छिद्र पटकन लक्षात येतं. वरून पाहता ते दिसत नाही. त्यामुळे, ही कृती नक्की करावी. नाहीतर घरी गेल्यानंतर पाणी ओतल्यानंतर माठ गळतोय असे दिसेल.
माठ असा करा स्वच्छ
माठ हातात घेतल्यावर हाताला माती लागते. ती माती पोटात जाऊ नये, म्हणून सर्वात आधी माठ धुवून घ्यावा. माठ आधी साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर स्क्रबवर मीठ घ्या. आणि मीठाने माठ घासून घ्या. मीठ माठाच्या आतील बाजूस लावून घासून घ्या.
माठावर झाका सुती कापड
यानंतर माठ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर माठात पाणी घालून तो खळखळून धुवा. त्यानंतर माठात पाणी भरून ठेवा. पाणी भरल्यानंतर एक सुती कापड भिजवून माठाभोवती गुंडाळून ठेवा. हे कापड सुकले ती ते थोडे थोडे ओले करावे. ज्यामुळे माठात पाणी थंड राहते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.