Kitchen Tips : स्वयंपाकघरात झाला किड्यांचा सुळसुळाट, डाळ,तांदूळ अन् मसाल्यांची अशी करा साठवणूक

Useful Kitchen Hacks : किडे लागलेला पदार्थ आपण वापरण्याचा विचारही करू शकत नाही, त्यामुळे अशा अळ्या अन् किड्यांना आळा कसा बसवायचा हे पाहुयात
Kitchen Tips
Kitchen Tips esakal
Updated on

Kitchen Tips :

सध्याचे वातावरण जसे आपल्या प्रकृतीसाठी मारक आहे. तसे ते आपल्या घरातील किड्यांसाठी पोषक ठरते. त्यामुळे या दिसवात किड्यांची पैदास जास्त प्रमाणात होते. त्यामुळे, अन्नधान्याची नासाडी होते. कारण, हे किडे धान्यात शिरतात. त्यामुळे, त्यांची साठवणूक कशी करावी याबद्दलच्या काही टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत.

घरात सर्वात जास्त किडे हे स्वयंपाकघरात असतात. कारण, स्वयंपाकाचे तेलकट डाग, खरकटं, यांमुळे स्वयंपाकघरात किडे जास्त वाढतात. हे किडे केवळ धान्यात नाही तर मसाल्यांच्या पदार्थातही मिसळतात.

किडे केवळ पदार्थ खात नाहीत. तर तो खराबही करतात. किडे लागलेला पदार्थ आपण वापरण्याचा विचारही करू शकत नाही. त्यामुळे अशा अळ्या अन् किड्यांना आळा कसा बसवायचा हे पाहुयात. (Kitchen Tips In Marathi)

Kitchen Tips
Kitchen Tips : या गोष्टी कुकरमध्ये शिजवणं बेतू शकतं जीवावर, वेळीच माहिती करून घ्या, निरोगी रहाल

तांदूळ

आपल्या आवडीचे उत्तम प्रतीचे तांदूळ वर्षभराच्या साठवणीकरता भरावे त्यामुळे वर्षभर एकाच प्रतीचा तांदूळ खायला मिळतो व पाण्याचा अंदाज एकदा आला की भात बिघडायचा प्रश्नच राहात नाही. साधारण जानेवारी, फेब्रुवारीत नवा तांदूळ आला की घरी आणून १०० किलो तांदळाला ४०० ग्रॅम बोरीक पावडर ह्या प्रमाणात चोळून लावावी व डब्यात भरावी.

भरताना डब्यात खाली व डब्याच्या तोंडाला बोरीक पावडर घालून डबे घट्ट झाकण लावून ठेवावेत. वर्षभर तांदूळ उत्तम राहतो नवा तांदूळ आल्यावर भरावा पण ६ महिन्यानंतर म्हणजे जुलैनंतर खाण्यास वापरावा म्हणजे बाधत नाही. उत्तम मोकळा भात होतो.

Kitchen Tips
Kitchen Tips: स्टफिंग पराठा बनवताना सारण बाहेर निघतं का? फॉलो करा 'या' टिप्स

डाळी

वर्षभराकरता साठवणीच्या डाळी भरायच्या असतील तर डाळी ३-४ दिवस उन्हात खडखडीत वाळवून मग भराव्यात. लक्षात घ्या की, तूरडाळ उन्हात वाळवू नका.

गहू

रोजच्या पोळ्यांकरता गहू वर्षभराकरता साठवावा. होळीनंतर नवा गहू बाजारात येतो तेव्हा तो स्वस्त असतो. गहू घेतल्यावर २-३ दिवस उन्हात खडखडीत वाळवावा. चौथ्या दिवशी गहू दिवसभर उन्हात तापला की ऊन उतरल्यावर गहू गरम असतानाच १०० किलो गव्हाला २०० ग्रॅम एरंडेल तेल दोन्ही हाताने चोळून लावावे व गहू पत्र्याच्या हवाबंद डब्यात भरावा.

वर्षभर उत्तम टिकतो. एरंडेल तेल पोटात गेले तरी आरोग्याला चांगले. गव्हात अजिबात पोरकिडे होत नाहीत. बाजारात मिळणाऱ्या पाऱ्याच्या गोळ्या धान्यात टाकायला हरकत नाही, पण त्यांचा वापर सावधपणे करावा लागतो. कारण त्या चुकून पोटात गेल्या तर अपायकारक असतात.

चिंच

चिंच साठवायची असेल तर उन्हामध्ये खडखडीत वाळवावी व १ किलो चिंचेला पाव किलो बारीक मीठ लावून चिनी मातीच्या बरणीत भरावी. वर्षभर खडखडीत कोरडी राहते. गोळे करायची जरूर नाही. चिंचेचा रंगही वर्षभर बदलत नाही.

Kitchen Tips
Kitchen Tips : मसाले स्टोअर करण्याची योग्य पद्धत शिकून घ्या, वर्षानुवर्षे टिकेल त्यांचा घमघमाट!

गूळ

गुळाची ढेप फोडून गूळ शक्यतो वाळवून प्लॅस्टिकच्या छोट्या पिशव्यात भरून बंद करून डब्यात ठेवाव्यात. नुसत्या डब्यात गुळाचा रंग बदलून काळपट होतो. प्लॅस्टिकच्या छोट्या पिशव्यात गूळ चांगला राहतो. रंग बदलत नाही.

साखर

साखर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून वर ७-८ लवंगा ठेवाव्यात म्हणजे मुंग्या लागत नाहीत. डब्याचे झाकण घट्ट नसेल तर प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशवीत साखर घालून मग डब्यात घालावी म्हणजे ओलसर होत नाही.

तिखट, हळद

तिखट, हळद व्यवस्थित चाळून प्लॅस्टिकच्या घट्ट झाकणाच्या बरणीत भरल्यास वर्षभर चांगली राहते. बरणीचे झाकण मात्र घट्ट हवे.

Kitchen Tips
Kitchen Vastu Tips: स्वयंपाक घराची योग्य जागा कोणती? स्वयंपाक करताना कोणते नियम पाळावेत?

कडधान्ये, रवा, वऱ्याचे तांदूळ

कडधान्ये, रवा, वऱ्याचे तांदूळ थोडे भाजून मग भरावे म्हणजे आळ्या होत नाहीत.

मीठ

 थोडे भाजून चिनीमातीच्या बरणीत भरावे म्हणजे मिठाला पाणी सुटत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.