Cake Online Order : ऑनलाईन केक ऑर्डर करताना या गोष्टींचा नक्की विचार करा, नाहीतर...

केक शिळा असेल तर पटकन ओळखता येतं?
Cake Online Order
Cake Online Orderesakal
Updated on

Online Order Tips :

ऑनलाईन वस्तू मागवणे हे सध्या कॉमन झालं आहे. वस्तू मागवायच्या आवडल्या नाहीतर रिटर्न करायच्या, असे प्रकार दररोजच सुरू असतात. पण, ऑनलाईन पद्धतीने वाढदिवसाचा केक मागवल्याने एका कुटुंबावर दु:खचा डोंगर कोसळला आहे.

ऑनलईन पद्धतीने केक मागवला अन् तो खाऊन एका १० वर्षीय चिमुरडीला आपले प्राण गमवावे लागले आहेत. पटियाला येथील मानवी नावाच्या 10 वर्षांच्या मुलीच्या वाढदिवसाला ऑनलाइन केक ऑर्डर करण्यात आला होता. केक खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला.

Cake Online Order
Banana Cake Recipe: बिना मैदा आणि बिना अंड्याशिवाय केक कसा तयार करायचा?

वृत्तामध्ये असं समजत की तिच्या आईने ऑनलाईन पद्धतीने केक मागवला होता.  बिलावर पटियाला येथील नोंदणीकृत 'केक कान्हा'चा पत्ता दिला आहे, मात्र, त्याठिकाणी या नावाचे कोणतेही दुकान नाही. याप्रकरणी बेकरी क्लाउड किचन असल्याचा संशय पोलिसांना आहे. 

ऑनलाइन केक खरेदी करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्याबद्दल आपण जाणून घेऊ.

फक्त ताजा केक घ्या

तज्ज्ञांच्या मते, शिळा केक खाल्ल्याने फूड पॉयझनिंगची समस्या उद्भवते आणि लोक आजारीही पडतात, त्यामुळे नेहमी ताजा केक घ्या. अनेक ऑनलाइन बेकर्स 2 तासांपूर्वी बनवलेला फ्रेश केक डिलिव्हरी करतात, त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडूनच केक मागवावा.

Cake Online Order
Christmas Cake : ख्रिसमस केकचे हे ७ प्रकार तुम्हाला माहितीयेत का ?

एग्लेस केक ऑनलाइन खरेदी करा

फक्त एग्लेस केक खरेदी करा कारण हे केक जास्त काळ टिकतात आणि लवकर खराब होत नाहीत. हे मिल्कमेड आणि जेलपासून बनवले जातात. तर अंडी घालून केलेला केक लवकर जुना होतो.

वास घेऊन पहा

केक खरेदी करताना त्याचा वास नेहमी घ्यावा किंवा जर तुम्ही तो ऑनलाइन ऑर्डर केला असेल तर तो खाण्याआधी नक्कीच त्याचा वास घ्या. दुर्गंधी आल्यास लगेच कस्टमर केअरकडे तक्रार करा आणि केक परत करा.

Cake Online Order
Christmas Plum Cake Recipe: यंदा घरीच करताय ख्रिसमस पार्टी? मग टेस्टी प्लम केकची ही रेसिपी नक्की ट्राय करा

केकची नीट तपासणी करा

अनेक वेळा शिळ्या केकवर पाण्याचे थर साचतात. त्यामुळे त्यामध्ये बुरशी आणि अनेक हानिकारक बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे आरोग्याला मोठी हानी होते. त्यामुळे, ऑनलाइन केक खरेदी केल्यानंतर, तो एकदा काळजीपूर्वक तपासा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()