Kitchen Tips : टिपिकल पदार्थांना अधिक स्वादिष्ट बनवायचंय तर या गोष्टी नक्की करा, जेवणाच्या टेबलावर होईल तुमचंच कौतुक

Easy Kitchen Tips : उत्कृष्ठ गृहिणी असला तरी कधीतरी परफेक्ट पदार्थ बनवण्याची ट्रिक आपल्याला माहीत नसते.
Kitchen Tips
Kitchen Tips esakal
Updated on

Kitchen Tips :

आपण रोजच स्वयंपाक बनवतो अन् जेवतो. हातात बसलेला पदार्थ नेहमी एकाच चवीचा बनतो. बरं एक –दोन वेळा खाल्ल्यानंतर ती चव नकोशी वाटते. कारण, त्या जिभेला सतत काहीतरी नवे ट्राय करावे असे वाटत असते.

तुम्ही उत्कृष्ठ गृहिणी असला तरी कधीतरी परफेक्ट पदार्थ बनवण्याची ट्रिक आपल्याला माहीत नसते. त्यामुळे पदार्थाला नवी चव येत नाही. तुम्हालाही स्वयंपाकात एक्सपर्ट बनायचे असेल तर काही टिप्स तुमच्या कामी येतील. (Kitchen Tips In Marathi)

Kitchen Tips
Kitchen Tips : मसाले स्टोअर करण्याची योग्य पद्धत शिकून घ्या, वर्षानुवर्षे टिकेल त्यांचा घमघमाट!

पराठ्याला द्या नवी चव

पराठे अधिक चविष्ट बनवण्यासाठी पीठात  उकडलेला बटाटा किसून घाला. तसेच, पराठा बनवताना तेलाचा किंवा तूपाचा वापर करण्याऐवजी बटरचा वापर करा अधिक टेस्टी लागतील.

भजी कुरकुरीत बनवा

भजी कुरकुरीत होण्यासाठी पिठात थोडेसे तांदळाचे पीठ  णि थोडे गरम तेल घातल्यास, भजी अधिक कुरकुरीत आणि चवदार बनतात. तसेच खाण्यापूर्वी भजींवर चाट मसाला टाकावा. त्यामुळे खाण्यास आणखी मजा येते.

Kitchen Tips
Kitchen Tips : ही ट्रिक वापराल तर पाच तासात लागेल दही, फक्त या चूका करू नका

विकतसारखे सुटसुटीत नुडल्स असे बनवा

नूडल्स उकळताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि तेल घाला. उकळल्यानंतर गार पाण्यात ठेवा. त्यामुळे नूडल्स एकमेकांना चिटकणार नाहीत.

राजमा किंवा उडीद डाळीचा पदार्थ बनवण्यासाठी पाण्यात उकळताना मीठ घालू नये, ते त्वरीत शिजेल. डाळ-राजमा पूर्ण शिजल्यानंतर मगच त्यामध्ये मीठ घालावे.

पनीर घट्ट असेल तर 

जर पनीर घट्ट असेल तर  चिमूटभर मीठ घातलेल्या पाण्यात पनीर १० मिनिटे ठेवा. पनीर मऊ होईल. आणि तांदूळ शिजवताना पाण्यात लिंबाचा रस मिसळल्याने भात अधिक पांढरा आणि चवदार होतो.

Kitchen Tips
Kitchen Tips : बघेल तिकडे मुंग्यांचा ढिगारा, तर या टिप्स वापरा, मुंग्या घरात पाऊल टाकणार नाहीत!

भेंडीला जास्त वेळ ताजे ठेवण्यासाठी त्यावर थोडेसे मोहरीचे तेल शिंपडा. मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा. तसेच, रायतामध्ये हिंग आणि जिऱ्याची पूड घालण्याऐवजी रायत्याला जिरा आणि हिंगाचा तडका द्या.

पुरी कुरकुरीत बनवण्यासाठी त्याला पीठ लावताना त्यात एक चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ घाला. यामुळे पुऱ्या  कुरकुरीत होतात. तसेच पुरीचे पीठ भिजवताना एक चमचा साखर घाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.