Hand Breakच्या मदतीने कार पार्क करावी की नाही? तुम्हाला देखील हा प्रश्न पडत असेल तर हे नक्की वाचा

हँड ब्रेकचा वापर दोन कारणांसाठी केला जातो याबद्दल अनेकांना कल्पना नाही. आज आम्ही अनेकांचा हा समज दूर करणार आहोत
कारच्या हँडब्रेकचा वापर
कारच्या हँडब्रेकचा वापरEsakal
Updated on

कारमध्ये दोन प्रकारचे ब्रेक देण्यात आलेले असतात एक म्हणजे फूट ब्रेक आणि दुसरा म्हणजेच हँड ब्रेक. कार चालवत असताना सहसा फूट ब्रेकचा जास्त वापर केला जातो. तर हँड ब्रेक कार पार्क करण्यासाठी काहीजण वापरतात किंवा इमरजन्सीसाठी Emergency. Know About usage of your car hand brake

खरं तर कार पार्क करताना हँड ब्रेकचा Car Brake वापर करावा की नाही याचं उत्तर सोप असलं तरी अनेकजणांना हा गोंधळात टाकणारा आहे. कारमधील हँड ब्रेकचा वापर हा केवळ इमरजन्सीसाठी Emergency असतो असा अनेक जणांचा गैरसमज आहे.

मात्र खऱ्या अर्थाने हँड ब्रेकचा वापर दोन कारणांसाठी केला जातो याबद्दल अनेकांना कल्पना नाही. आज आम्ही अनेकांचा हा समज दूर करणार आहोत.

कार पार्क Car Parking करत असताना हँड ब्रेक लावून कार पार्क करणं हा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. हँड ब्रेकलाच पार्किंग ब्रेक देखील म्हंटलं जातं. हा एक मॅकेनिकल ब्रेक असून यामुळे कारची चाकं जाम राहतात. तसचं हँड ब्रेक इमनजन्सी ब्रेक म्हणूनही वापरला जातो. म्हणजे हा ब्रेक पार्किंग आणि इमरजन्मी ब्रेक अशी दोन्ही कामं करतो.

हँड ब्रेकचा करा असा वापर

इमरजन्सीच्यावेळी हँड ब्रेक तुम्हाला कामी येऊ शकतो. खास करून तीव्र उतारावर कार नियंत्रणात ठेवण्यासाठी या ब्रेकचा वापर होतो. तसंच कार पार्क करताना कार पार्किगच्या योग्य जागेवर कार पार्क केल्यानंतर हँड ब्रेक लीव्हर खेचून लॉक करा. हँड ब्रेक लावल्यानंतर कारला तुम्ही गियरमध्ये देखील टाकू शकता. यामुळे सेफ्टी अधिक राहते.

अलिकडे येणाऱ्या नव्या इलेक्ट्रिकल कारमध्ये पार्किंगसाठी वेगळे ब्रेक येऊ लागले आहेत. यामुळे हँड ब्रेक लिव्हर नसून त्याएवजी एक बटन देण्यात येतं. या बटनाच्या मदतीने पार्किंग ब्रेकचा वापर तुम्ही करू शकता.

पार्किंग ब्रेक ही एकाप्रकारे सेकंडरी ब्रेकिंग सिस्टम आहे. ती कारमधील संपूर्ण ब्रेक सिस्टमचा एक महत्वपूर्ण भाग असते. हे ब्रेक रियर ब्रेकसोबत जोडले गेलेल असतात. जेव्हा हँड ब्रेक लावला जातो तेव्हा प्रायमरी ब्रेकच्या तुलनेत कमी दबाव टाकला जातो. जेव्हा प्रायमरी ब्रेकिंग सिस्टम फेल होण्याची शक्यता असते तेव्हा कार थांबवण्यासाठी या ब्रेकचा वापर होतो. शिवाय कार पार्क करण्यासाठी देखील हँड ब्रेक वापरला जातो.

हे देखिल वाचा-

कारच्या हँडब्रेकचा वापर
Car Safety Tips : कारमध्ये लॉक झालात तर काय कराल?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.