Driving Tips : Car Dashboard वर असलेल्या लाइट्सचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे का?

कारमधील डॅशबोर्ड आणि स्पीडोमीटर बॉक्समध्ये अनेक इंडिकेटर्स, लाइट आणि सिग्नल देण्यात आलेले असतात. जे आपल्या वेळोवेळी विविध संकेत देत असतात
कारच्या डॅशबोर्डवरचे लाईटस्
कारच्या डॅशबोर्डवरचे लाईटस्Esakal
Updated on

कार ड्राइव्ह करत असताना ती काळजीपूर्वक आणि संयमाने चालवणं गरजेचं असतं. तसचं कार चालवत Car Driving असताना स्वत:ची आणि कारमधील प्रवाशांसोबतच इतर वाहनचालकांची सुरक्षा देखील महत्वाची ठरते.  Know about warning lights on your car dashboard

कारण तुमची एक चुक तुमच्या किंवा इतरांच्या जीवावर बेतू शकते. यासाठीच ड्रायव्हिंग Car Drive करत असताना सर्व नियमांचं पालन करून आणि सुरक्षिततेची Security संपूर्ण काळजी घेऊन प्रवास करणं महत्वाचं आहे. 

अलिकडे मार्केटमध्ये गाड्यांची विविध आधुनिक मॉडेल येत आहेत. अनेक ऑटोमोबाईल कंपन्या आपल्या विविध कारमध्ये सुरक्षितेसोबत प्रवास Travel सहज आणि सोपा होण्यासाठी विविध फिचर्स देतात. कारचा दरवाजा पूर्णपणे बंद न झाल्यास किंवा सीट बेल्ट न लावल्यास अनेक कारमध्ये साऊंड वॉर्निंग दिली जाते तर काहीवेळेस इंडिकेटर ब्लिंक होतात..

कारमधील डॅशबोर्ड आणि स्पीडोमीटर बॉक्समध्ये अनेक इंडिकेटर्स, लाइट आणि सिग्नल देण्यात आलेले असतात. जे आपल्या वेळोवेळी विविध संकेत देत असतात.

मात्र अनेकजण या सिग्नल किंवा इंडिकेटर्सकडे दुर्लक्ष करतात. तर अनेकांना हे लाइट्स किंवा इंडिकेटरचा अर्थच ठाऊक नसतो. मात्र या इंडिकेटर्सकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरू शकतं. 

डोर वॉर्निंग लाइट- कारचं एखादं दार पूर्णपणे बंद न झाल्यास ही लाईट डॅशबोर्डवरील इंडिकेडर्सवर दिसते. यामुळे कारचं दार उघडं असल्याचं लक्षात येतं. कार ड्राइव्ह करत असताना दार उघडं राहणं धोकादायक ठरू शकतं. यासाठीच या लाइटचा उपय़ोग होतो. 

सीटबेल्ट वॉर्निंग लाइट- कार ड्रायव्हिंगसीटवरील चालकाने सीट बेल्ट घालणं बंधनकारक आहे. त्याचसोबत सीटबेल्ट न घातल्यास कारच्या एअर बॅग उघडतं  नाहीत. म्हणूनच सुरक्षिततेसाठी सीटबेल्ट घालणं गरजेचं आहे. सीटबेल्ट न घातल्यास आयकन बीप वाजू लागतं.

हे देखिल वाचा-

कारच्या डॅशबोर्डवरचे लाईटस्
Driving Tips: तुम्ही देखील पावसामध्ये कार चालवताना Hazard Light ऑन ठेवताय? मग जाणून घ्या योग्य माहिती

इंजिन वाॅर्निंग लाइट- कारच्या डॅशबोर्डवर असलेली इंजिन लाइट ब्लिंक होवू लागल्यास इंजिनमध्ये एखादा बिघाड झाल्याच लक्षात घ्यावं. अशावेळेस या सिग्नलकडे दुर्लक्ष करून प्रवास करू नये. लगेच कार सर्विस सेंटरला घेऊन जावी.

सर्व्हिस रिमांयडर लाइट- कारला वेळोवेळी मेंटेनेंन्सची आवश्यकता भासते. यासाठी कारमधील इंडिकेटर ब्लिंक होतात. अनेकदा वेळेअभावी कार सर्व्हिसिंग करणं शक्य होत नाही. यासाठीच जेव्हा कारच्या सर्व्हिसिंगची वेळ येते तेव्हा सर्व्हिस लाइट ब्लिंक होऊ लागतो.

हॅन्ड ब्रेक आयकाॅन- जेव्हा कारमध्ये हॅन्ड ब्रेक लावला जातो तेव्हा हॅन्ड ब्रेक लाइट पेटतो. हॅण्ड ब्रेक पूल केल्यानंतर ही जर हा लाइट तसाच राहिला तर ब्रेक्रिंग सिस्टिममध्ये बिघाड निर्माण झाल्याचं समजावं. 

बॅटरी चार्ज वॉर्निंग लाइट- बॅटरी डाऊन झाल्यास बॅटरी चार्ज वॉर्निंग लाइट ब्लिंक होवू लागतो. अशा वेळी बॅटरीला चार्जिंग करण्याची आवश्यकता असल्याचं लक्षात घ्यावं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.