घरामध्ये दैनंदिन आपण अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करत असतो. मग अगदी तो घरातील पंखा किंवा एसी असो किंवा टिव्ही. तसचं वॉशिंग मशिन, रेफ्रिजिरेटर, गिझर अशा अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू Electronic Gadgets हल्ली घराघरामध्ये गरजेच्या ठरत आहेत. Know about wholesale Markets in Maharashtra for cheap Buying
दर काही वर्षांनी अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये बदल घडून अपग्रेटेड उपकरणं बाजारामध्ये येत असतात. बाजारामध्ये येणारी नवंनवीन इलेक्ट्रॉनिक अॅडव्हान्स्ड उपकरणं Advanced Gadgets आपल्याही घरात असावी असं प्रत्येकाला वाटतं असतं.
मात्र अनेकदा ही उपकरणं महाग असल्याने खिशाला मोठी कात्री लागेल या चिंतेने अनेकजण या उपकरणांच्या खरेदीचा Shopping प्लॅन रद्द करतात. मात्र आज आम्ही तुम्हाला असे काही मार्केट सांगणार आहोत. जिथं तुम्हाला या उपकरणांवर मोठी सूट मिळू शकते.
हे देखिल वाचा-
महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी होलसेल मार्केट कुठे आहेत, याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. जिथं तुम्हाला या उपकरणांवर मोठी सूट मिळेल.
लॅमिंग्टन रोड, मुंबई- मुंबईतील लॅमिंग्टन रोड हे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि गॅझेट्ससाठी प्रसिद्ध असं मार्केट आहे. इथं मोबाईलच्या हेडफोनपासून, कॅमेऱ्यांचे विविध भाग, तसचं लॅपटॉप आणि त्याचे भाग तसंच विविध उपकरणं सारं काही तुम्हाला मिळेल.
वेगवेगळ्या उपकरणांसाठी किंवा वस्तूंसाठी किती वेगवेगळ्या गल्ल्या आहेत. तुम्हाला इथं उपकरणांसोबतचे त्यांचे पार्टसंही मिळतील. इथं उपकरणं स्वस्त मिळतील मात्र तुम्हाला त्यासाठी दुकानदाराशी घासाघीस करता येणं गरजेचं आहे.
हिरा पन्ना, हाजीअली- मुंबईतील हे एक अत्यंत जुनं शॉपिंग सेंटर आहे. इथं तुम्हाला स्वस्त दरात मोबाईल तसचं लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक घरोपयोगी उपकरणं मिळतील.
मनिष मार्केट- क्रॉफर्ड मार्केटला लागून असलेल्या मनिष मार्केटमध्ये खास करून विविध समजावटीच्या लायटिंग, हेअर ड्रायर, म्युझिक सिस्टम, पोर्टेबल पंखे अशा छोट्या मोठ्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू अगदी स्वस्त दरात मिळतील.
याचसोबतच मुंबईतील काळबादेवी इथली लोहार चाळ, विलेपार्ले मधील अल्फा मार्केट आणि दादर स्टेशन परिसरातील कबूतरखाना इथंही तुम्ही स्वस्त उपकरणांसाठी एक भेट देऊ शकता.
हे देखिल वाचा-
भिवंडी- भिवंडीमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे अनेक मोठी वेअरहाउस आहेत. जिथं तुम्हाला वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रिज, ओव्हन अशा अनेक मोठ्या उपकरणांवर मोठी सूट मिळेल. तसचं सर्व ब्रॅण्डच्या बाजारात आलेल्या नव्या मॉडल्सच्या उपकरणांवरही मोठी सूट मिळेलं.
तापकीर गल्ली, पुणे- पुण्यातील बुधवार पेठेत पासोड्या विठोबा मंदिरापासून या मार्केटला सुरुवात होते. इथं तुम्हाला आकर्षक झुंबरं, तसचं घरातील लाइट्स. पंखे, गिझर, एसी तसचं अनेक इलेक्ट्रिक उपकरणं मिळतील. इथल्या दुकानांमध्ये होलसेल आणि रिटेल दोन्ही पद्धतीने उपकरणांची विक्री केली जाते.
इथं तुम्हाला घरासाठी आवश्यक उपकरणं कमी किमतीत उपलब्ध होतील. या मार्केटमध्ये नावाजलेल्या ब्रॅण्डचे देखील सर्व प्रोडक्ट तुम्हाला मिळतील.
लक्ष्मी रोड पुणे- पुण्यातील लक्ष्मी रोडचा फेरफटका मारलात तर इथे तुम्हाला अनेक इलेक्ट्रॉनिक दुकानं एकाच मार्केटमध्ये मिळतील. इथं तुम्हाला होम अल्पायन्सेस आणि इलेक्ट्रीक वस्तूंची खरेदी करता येईल.
M.G रोड नाशिक- नाशिकमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिकची खरेदी करायची असेल तर एमजी रोडला भेट द्या. इथं मोबाईल, मोबाईच्या एक्सेसरीज, गॅजेट्स तसचं इलेक्ट्रॉनिक उपकरणांची अनेक दुकानं आहेत. शिवाय योग्य दरात तुम्हाला उपकरणं मिळतील.
तेलीपुरा, नागपूर- नागपूरमधील सिताबुल्डी इथं असलेल्या तेलीपुरा हा मार्केट इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. इथं विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्हाला होलसेल दरामध्ये मिळतील.
सजावटीच्या लायटिंग पासून ते होम अल्पायन्सेस तसचं उपकरणांच्या दुरुस्तीची दुकान या मार्केटमध्ये आहेत.
https://youtu.be/-tJ1l0JmHSE
पैठणगेट, औरंगाबाद- जर तुम्ही औरंगाबाद किंवा जवळपासच्या परिसरात राहत असाल तर पैठणगेट मार्केट हा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी चांगला पर्याय आहे. खास करून इथे मोबाईल, गॅजेट्स साऊंड सिस्ट्मची अनेक दुकानं आहेत.
तर ही आहेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये असलेली काही प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक मार्केट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.