खरेदी म्हणजे खास करून महिला आणि मुलींचा जिव्हाळ्याचा विषय. कोणतीही वस्तू, दागिने, मेकअप किंवा कपडे खरेदीसाठी Shopping मुलींना कोणत्याही निमित्ताची गरज नसते. बरं शॉपिंग करताना ती स्वस्तात मस्त कशी होईल असा प्रत्येकीचा प्रयत्न असतो. Know Best Places in Mumbai for Street Shopping
खास करून कॉलेजमधील तरुणींना कायम चांगले आणि ट्रेंडमध्ये असणारे कपडे Clothes किंवा ज्वेलरी आपल्याकडे असावी असं वाटतं. मात्र मोजक्या पॉकेट मनीमधून कायम महागडे कपडे खरेदी करणं शक्य नसतं. यासाठी मग स्ट्रीट शॉपिंग Street Shopping हा एक उत्तम पर्याय आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी तर आहे. पण त्यासोबतच इथं बॉलिवूड आणि फॅशन इंडस्ट्री असल्याने शॉपिंगसाठी देखील मुंबई हे देशातील एक बेस्ट शहर आहे. मुंबईतील विविध ठिकाणी स्ट्रीट शॉपिंगसाठी अनेक प्रसिद्ध असे मार्केट आहेत. या मार्केटमध्ये तुम्हाला अगदी लेटेस्ट आणि ट्रेंडमध्ये असलेल्या कपड्यांपासून, ज्वेलरी, बॅग, फूट वेअर असं सारं काही आणि तेही स्वस्तामध्ये मिळू शकतं.
अगदी सेलिब्रिटी वापरत असलेल्या ब्रॅण्डच्या कॉपी किंवा बड्या डिझायनरच्या कपड्यांच्या आणि बॅग्स किंवा इतर वस्तूच्या कॉपी तुम्हाला या स्ट्रीट शॉपिंगमध्ये स्वस्तात मिळतील. तेव्हा आज आम्ही तुम्हाला मुंबईतील स्ट्रीट शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेले काही मार्केट सांगणार आहोत.
वांद्रे लिंकिंग रोड- बांद्रा किंवा वांद्रे इथला लिंकिंग रोड हा स्ट्रीट शॉपिंगसाठी प्रसिद्ध आहे. फॅशनच्या बाबतीत जर तुम्हाला अपडेटेड राहायला आवडतं असले आणि तुम्हाला कमी बजेटमध्ये बरीच शॉपिंग करायची असेल तर लिकिंग रोडला फेरफटका नक्की मारा. खास करून वेस्टर्न आयुटफिट आणि लूकचे कपडे इथं स्वत दरात मिळतात.
बांद्र्यातील लिंकींओग रोडवर तुम्हाला चालू फॅशनचे कपडे अगदी स्वस्त दरात मिळतील. कपड्यांसोबतच फूट वेअरच्या भन्नाट व्हरायटी इथं पाहायला मिळतात. तसचं ट्रेंडी बॅग्स , गॉगल्स आणि ज्वेलरी तुम्हाला इथं मिळू शकते. अगदी हजार रुपयांमध्ये एक संपूर्ण लूक तुम्हाला तयार करता येईल.
वांद्रे हिल रोड- तुम्हाला एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे लूक तयार करायचा असेल तर वांद्र्यातील हिल रोडवरील शॉपिंग हा एक चांगला पर्याय आहे. इथं देखील ट्रेंडी, फॅन्सी कपडे, फूट वेअर तसचं बॅग्स आणि ज्वेलरी तुम्हाला स्वस्तात मिळेल. त्याचसोबत नाईट सूट किंवा काही फॅन्सी कुर्ते तुम्हाला हवे असतील तर कमी किमतीत तेही उपलब्ध होतील.
महिलांच्या अंतर्वस्त्राची व्हरायटी देखील इथं पाहायला मिळते. सोबतच एन्टिक ज्वेलरी आणि गॉगल्स या वस्तूंच्या लेटेस्ट डिझाइन इथं उपलब्ध होतात.
हे देखिल वाचा-
कुलाबा कॉजवे- तुम्ही जर दक्षिण मुंबईत South Mumbai शॉपिंगसाठी स्ट्रीट मार्केट पाहात असाल तर कुलाबा कॉजवे हा बेस्ट ऑपशन आहे. खास करून ट्रेंडी, ऍन्टिक ज्वेलरी हवी असेल तसचं फॅन्सी बॅगस् हव्या असतील तरी कुलाबा कॉजवेला तुम्हाला नक्कीच तुमच्या आवडीची शॉपिंग करता येईल.
कुलाबा कॉजवेला तुम्हाला स्वस्तात मस्त टॉप, वनपीस आणि जीन्स सहज मिळतील. कपड्यांसोबतच इथं ऍन्टिक शोपीसच्या वस्तू तसचं मोबाईल कव्हरच्या विविध व्हरायटी आणि पुस्तकं देखील अगदी कमी दरात मिळतील.
क्रॉफर्ड मार्केट- मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट हे स्ट्रीट शॉपिंगसाठीच एक असं ठिकाण आहे. जिथं एकाच ठिकाणी तुम्हाला अनेक वस्तू खरेद करणं शक्य आहे. म्हणजे इथं तुम्ही कपड्याच्या खरेदीसाठी गेला असाल तर इथेचं तुम्हाला इतर अनेक घरोपयोगी आणि सजावटीच्या वस्तू देखील स्वस्तात मिळतील.
क्रॉफर्ड मार्केटमध्ये वेस्टर्न वेअर सोबतच इथे खासकरून इंडियन वेअर कपडे स्वस्त दरात मिळतात. यात अगदी कुर्ता, कुर्ता सेटपासून ते हेवी चालू फॅशनमधील सलवार सूट तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला मिळेल. इथे तुम्हाला ज्वेलरी, मेकअप, बॅग्स तसचं लहान मुलांसाठी देखील कपडे आणि खेळणी स्वस्तात मिळतील.
फॅशन स्ट्रीट- मरीन ड्राइव्ह इथं असलेल्या फॅशन स्ट्रीटवर मुलींसोबतच मुलाचे देखील कपडे, बुटं आणि बॅग्स अगदी स्वत दरामध्ये मिळतात. ट्रेंडी टी-शर्ट, शूज तसचं सनग्लासेस अगदी स्वस्तात मस्त इथे तुम्हाला मिळतील. तसचं मोबाईल कव्हर, कॅफ आणि थंडीच्या काळामध्ये वेगवेगळे जॅकेट्स इथं स्वस्तात मिळतात.
भुलेश्वर मार्केट – वेस्टर्न कपडे किंवा फॅशनसंबधी शॉपिंगसाठी वांद्रा, कॉजवे हे चांगले पर्याय आहेत. मात्र जर तुम्हाला चांगल्या भरजरी साड्या, रेडीमेड हेवी ब्लाउज, तसचं लेहंग्यासाठी कापड अशी शॉपिंग करायची असले तर भुलेश्वर मार्केट उत्तम पर्याय आहे.
लग्नासाठी स्वस्तात मस्त साड्या हव्या असतील किंवा सेमी स्टिच्ड लेहंगा तसचं सलवार सूट इथं अगदी कमी दरात मिळतात. त्याचसोबत वेगवेगळ्या प्रकारचे दागिन्यांच्या खरेदीसाठी भुलेश्वर मार्केट प्रसिद्ध आहे.
लोखंडवाला मार्केट- अंधेरीतील लोखंडवाला मार्केट हा देखील स्ट्रीट शॉपिंगसाठी चांगला पर्याय आहे. सेलिब्रिटी लूकचे कपडे, तसचं बड्या डिझायनरच्या कपड्यांच्या कॉपी तुम्हाला इथे स्वस्तामध्ये मिळतील. सोबतच वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या बॅग्स तसचं सॅण्डल्सच्या कॉपी देखील इथं स्वस्तात मिळतात.
यासोबतच दादार ईस्टला स्टेशनजवळ असलेल्या मार्केटमध्ये ही तुम्हाला कुर्ता, पंजाबी ड्रेस तसचं ड्रेस मटेरियल आणि दागिन्यांच्या व्हरायटी पाहायला मिळतील. तसचं मनिष मार्केट, विले पार्लेमधील इर्ला मार्केट इथे देखील तुम्ही एक फेरफटका नक्की मारू शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.