तंदुरुस्तीसाठी महागडा आहार घेण्याची गरज नाही, जाणून घ्या हे स्वस्त पर्याय

न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा (Nutritionist Lovneet Batra) यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले प्रथिनेयुक्त आहार महाग नसतो, असे स्पष्ट सांगितले
Nutritious Budget-Friendly Foods
Nutritious Budget-Friendly Foodssakal
Updated on

उत्तम निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आपण वाट्टेल ते प्रयत्न करतो. प्रत्येकाला उत्तम आरोग्य, प्रथिनेयुक्त अन्न खाण्याची इच्छा असते.मात्र असा समज आहे की निरोगी आणि पौष्टिक आहार खुप महाग असतो.त्यामुळे बरेच लोक तंदुरुस्त होण्याचे त्यांचे ध्येय मध्येच सोडून देतात.

न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा (Nutritionist Lovneet Batra) यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले प्रथिनेयुक्त आहार महाग नसतो, असे स्पष्ट सांगितले. त्यांच्या मते, प्रथिनेयुक्त अनेक खाद्यपदार्थ सहज उपलब्ध होतात. जे आपण आपल्या रोजच्या आहारात सहज घेऊ शकतो.त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये अशा प्रथिनेयुक्त आहारांची माहिती दिली आहे.

Nutritious Budget-Friendly Foods
एका महिन्यात पोटाची चरबी होणार कमी, जाणून घ्या या सोप्या टिप्स

1. बाजरी

बाजरी हे सर्वात सामान्य कडधान्यांपैकी एक आहे आणि रोजच्या जीवनातला भाग आहे.त्यामुळे ते सहज उपलब्ध होते.बाजरीत कॅलरीज आणि प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे.

2. केळी

केळी हे एक फळ आहे जे स्वस्त असून यात प्रामुख्याने पोटॅशियम, फायबर, कॅल्शियम आणि मॅंगनीजचा समावेश असतो. त्यात लोह, फोलेट, आणि व्हिटॅमिन बी 6 देखील आहे.हे शरीराला खुप उपयुक्त असते.

Nutritious Budget-Friendly Foods
तणावग्रस्त आयुष्य तुम्ही जगताय, करा हे उपाय

3. चणे (छोले)

तज्ज्ञांच्या मते, चणे हे मांस,कोंबडी आणि सीफूडसाठी एक उत्तम आणि स्वस्त पर्याय आहेत. चणे प्रथिनेयुक्त असून यात जीवनसत्त्वांचा समावेश आहे. हे तुमचे वजन नियंत्रित करण्यास आणि अनेक रोगांचा धोका कमी करण्यास मदत करते.


4. पालक

पालक अनेक आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. आहारात पालेभाज्यांचा समावेश करणे गरजेचे आहे. पालेभाज्या सॅलड्स सूप, आणि भाज्या बनवण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. पालक बाजारात सहज आणि अगदी स्वस्त दरात उपलब्ध राहू शकतात. पालकमध्ये व्हिटामिन के असतं जे हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते आणि हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका कमी करते.

5. मूग डाळ

मूग डाळीमध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त असते.हे स्नायूला मजबूत करण्यास मदत करते. जे लोक शाकाहारी आहार घेतात त्यांनी त्यांच्यासाठी मूग डाळ हा एक उत्तम पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.