नव वर्षाच्या पार्टीचा हँगओव्हर कसा उतरवाल? जाणून घ्या घरगुती उपाय

नव वर्षाच्या पार्टीचा हँगओव्हर कसा उतरवाल? जाणून घ्या घरगुती उपाय
Updated on

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्टीची(Party) जोरदार तयारी सुरू आहे, बहूतेक लोक सेलिब्रेशन( Celebration) वाईन-विस्कीशिवाय (Wine- Whisky) अर्धवट असते. कित्येक वेळा ओव्हर एन्जॉयमेंट किंवा मित्रांच्या सांगण्यावरून थोडे जास्त ड्रिंक(Drink) करतात परिणामी दुसऱ्या दिवशी हँगओव्हर (Hangover) होतो.

पार्टीनंतर दुसऱ्या दिवशी काहीच चांगले वाटत नाही. काही लोकांना डोके दुखी(Headache), थकवा(weariness) डोळे जड होणे असे त्रास होतात. ड्रिंक करण्यामुळे होणाऱ्या या परिणांमाना हँगओव्हर म्हणतात. कित्येकदा हँगओव्हरमुळे चक्कर येते, ताण येतो किंवा चिडचिड होते. त्यामुळे पार्टीच्या दुसऱ्या दिवशी कित्येक लोकांना त्रास होतो. (Know-How To Avoid Hangovers At New Year's Parties)

हँगओव्हर संबधी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ या, ज्या पार्टी किंवा सेलिब्रेशनच्या दिवासांमध्ये तुम्हाला हँगओव्हर होण्यापासून मदत करतील.

नव वर्षाच्या पार्टीचा हँगओव्हर कसा उतरवाल? जाणून घ्या घरगुती उपाय
Lookback 2021 : भारताच्या ऑलिम्पिक इतिहासातील २०२१ ठरले 'सुवर्ण'वर्ष

हँगओव्हर म्हणजे काय? ( What is Hangover)

  • सर्व प्रकारच्या अल्कोहोल ड्रिंक्समध्ये इथेनॉलपासून बनलेले असते.

  • प्रत्येक ड्रिंकमध्ये त्याचे प्रमाण वेगवेगळे असते.

  • इथेनॉलमध्ये एसीटेल्डिहाईड नावाचे केमीकल असते, शरीरामध्ये असलेल्या एंजाईमला दुसऱ्या केमीकलमध्ये बदलण्याचे काम करते.

  • एक्सपर्टच्या सल्ल्यानुसार, अशा टॅल्डिहाइड मुळे हँगओव्हर होते.

  • जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या क्षमतेपेक्षा जास्त पेग पितो तेव्हा पार्टीच्या दुसऱ्या दिवशी त्याला ड्रिंकचा परिणाम जाणवतो त्यालाच हँगओव्हर म्हणतात.

हँगओव्हर का होतो?

  • रिकाम्या पोटी दारू प्यायल्यामुळे

रिकाम्या पोटी ड्रिंक केल्यामुळे शरीरामध्ये लवकर पसरते ज्यामुळे त्याची नशा चढते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी हँगओव्हर होतो.

  • पाण्याशिवाय ड्रिंक करणे

पाणी एकत्र न करता अल्काहोल प्यायल्यामुळे वारंवार लघवीला जावे लागते ज्यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाईट्सची कमतरता होते, हे देखील हँगओव्हर होण्याचे कारण होऊ शकते.

  • कॉन्जेनर्स

दारूमध्ये मिसळले जाणारे केमीकल, कॉन्जेनर्स देखील हँगओव्हरचे कारण ठरू शकतात, व्हिस्कीसोबत डार्क कलरच्या ड्रिंकमध्ये याचे प्रमाण जास्त असते.

  • तुमची क्षमता

तुमच्या क्षमता (Capcity) पेक्षा जास्त ड्रिंक केल्यास हँगओव्हर होतो. लोकांच्या वयानुसार त्यांची दारू पिण्याची क्षमतेवर देखील ते अवलंबून असते.

नव वर्षाच्या पार्टीचा हँगओव्हर कसा उतरवाल? जाणून घ्या घरगुती उपाय
Photo : साडीमध्ये खुलले श्वेता तिवारीचे सौंदर्य

हँगओव्हरचे लक्षण

  • हँगओव्हरचे लक्षण प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे असतात.

  • घसो कोरडा पडणे किंवा जास्त तहाण लागणे.

  • थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे

  • झोप कमी होणे

  • प्रकाश आणि आवाजच्याबाबतीत संवेदनशीलता

  • मांसपेशीमध्ये किंवा डोके दुखणे

  • मळमळ, उल्टी किंवा पोट दुखी.

  • ह्रदयाचे ठोके वाढणे

  • कोणत्या गोष्टीवर फोकस न करू शकणे

  • चक्कर आल्यासारखे वाटणे

  • थरथरल्या सारखे वाटणे

  • मुड खराब होणे, ताण येणे किंवा चिडचिड होणे.

नव वर्षाच्या पार्टीचा हँगओव्हर कसा उतरवाल? जाणून घ्या घरगुती उपाय
नव्या व्हायरससह जग हादरणार! बाबा वेंगाची भयावह भविष्यवाणी पुन्हा चर्चेत

हँगओव्हर उतरविण्याचे घरगुती उपाय

  • भरपूर पाणी प्या

हँगओव्हर झाल्यास भरपूर पाणी प्या, तुम्ही हाईड्रेट राहाल आणि शरीरातील घाण बाहेर पडेल.

  • लिंबू पाणी प्या

हँगओव्हर उतरविण्यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्या. त्यामुळे डोकेदुखणे थांबेल

  • कॉफी

हँगओव्हरनंतर होणारी मळमळ आणि डोकेदुखी थांबविण्यासाठी कॉफी मदत करते.

  • मध आणि आले

मध आणि आल्यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट उपलब्ध असतात ज्यामुळे उलटीचा त्रास कमी होतो.

  • नारळ पाणी

नारळ पाण्यात इलेक्ट्रलाईट्सचे असतात, जे शरीराला पुन्हा हाईड्रेट करतात आणि त्यातून आवश्यक न्युट्रएंट्स देखील मिळतात.

  • दही खा

दही खाल्यामुळे शरीरामध्ये असलेले बॅड बॅक्टेरिया ऐवजी गुड बॅक्टेरिया तयार होतात, ज्यामुळे हँगओव्हर कमी होतो.

नव वर्षाच्या पार्टीचा हँगओव्हर कसा उतरवाल? जाणून घ्या घरगुती उपाय
हिवाळ्यात मॉर्निंग वॉकला जाताय? आजारी पडायचं नसेल तर 'अशी' करा तयारी

हँगओव्हर होऊच नये म्हणून काय काळजी घ्यावी

  • कार्बन रिच डाएट

कार्बन रिच डाएट फॉलो केल्यामुळे अल्कोहल रक्तामध्ये मिसळ्याची गती मंदावते आणि दुसऱ्यादिवशी हँगओव्हर होत नाही

  • लाईट रंगाचे ड्रिंक घ्या

लाईट रंगाच्या ड्रिंक्समध्ये कॉन्जनर्सचे प्रमाण कमी असते, त्यामुळे सिरियस हँगओव्हर होण्याचा धोका जास्त असतो.

  • आपल्या क्षमता ओळखून प्या

मित्रांच्या सांगण्यावरून नाही तर आपल्या क्षमता ओळखून ड्रिंक करा

  • कार्बोनेटेड ड्रिंक पिणे टाळा

कार्बोनेटेड ड्रिंक तुमच्या रक्तात मिसळण्याचा वेग जास्त असतो त्यामुळे हँगओव्हर होऊ शकतो.

  • सिगारेटपासून लांब राहा

धूम्रपानाचा हाईड्रोजन, इम्यूनिटी आणि झोपेवर परिणाम होतो. ज्यामुळे हँगओव्हर होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.