Fashion | अशा गोष्टी करताना मुलांनी अजिबात लाजू नये

फॅशन, स्टाईल आणि स्किन केअर याबद्दल बोलताना मुलांनी लाजाळू आणि संकोच करण्याची गरज नाहीयेय.
Fashion
Fashion esakal
Updated on
Summary

फॅशन, स्टाईल आणि स्किन केअर याबद्दल बोलताना मुलांनी लाजाळू आणि संकोच करण्याची गरज नाहीयेय.

मुलं खूप मस्त दिसत असली तरी अशा अनेक बाबी आहेत ज्यात त्यांना त्या गोष्टी करायला लाज वाटते. आता तुम्ही विचार करत असाल की त्या कोणत्या गोष्टी आहेत. फॅशन (Fashion), स्टाइल (Style) आणि स्किन केअरशी (Skin care)संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत. ज्यासाठी मुलांना लाज आणि संकोच (Shame and hesitation) वाटतो. अशा केसेस आजच्या युगात फॅशन शेमिंग (Fashion Shaming) म्हणून ओळखल्या जातात. असे केल्याने त्यांचे इम्प्रेशन (Impressions) कमी होईल असे मुलांना वाटते. पण यामुळे इम्प्रेशन कमी होत नाही तर वाढते. बर्‍याच गोष्टी अशा असतात की, बघितल्यावर अनेक लोक त्या फॉलो करायला लागतात. फॅशन, स्टाईल आणि स्किन केअर याबद्दल बोलताना मुलांनी लाजाळू आणि संकोच करण्याची गरज नाहीयेय. त्यावर मनमोकळेपणाने व्यक्त झालं पाहिजे.

Fashion
लहान उंचीच्या मुलींनी 'या' फॅशन ट्रेंड्स करु नये फॉलो

जुने कपडे (Old clothes)घालणे

या फॅशनच्या जमान्यात मुलांना जुने कपडे घालायला लाज वाटते, जे की असे वाटू नये. प्रत्येकाला दर महिन्याला किंवा प्रत्येक हंगामासाठी नवीन ड्रेस (New dress)खरेदी करणे शक्य नसते. अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे जुने कपडे (Old clothes)असतील तर ते घालण्यास लाजू नका, परंतु ते शांत पद्धतीने घाला. कदाचित असे केल्याने, इतर मुले देखील हे सहज करू शकतील. यासोबतच फॅशनचे एक नवे पर्वही आपल्यासोबत असतील.

नवीन लूक आणि स्टाइल (New look and style)वापरून पहा

बहुतेक मुलांना नवीन लुक आणि स्टाइल (New look and style)करायला लाज वाटते. यामुळे ते विनोदाचा विषय बनू नयेत, असे त्यांना वाटते. जर एखादा नवीन ड्रेस (New dress) तुम्हाला चांगला वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही फॅशनच्या बाबतीत स्वतःला पुढे ठेऊन तो नक्कीच ट्राय करायला हवा.

Fashion
पुरूषांसाठीपण साडी फॅशन झाली आहे... तरूणाने शेअर केला व्हिडिओ

मेकअप किंवा त्वचेची काळजी (Makeup or skin care)

मुलांनाही सुंदर (Beautiful) आणि स्टायलिश (Stylish) दिसायचे असते. अशा परिस्थितीत तो त्वचेची काळजी (Skin care)आणि मेकअपही (Makeup) करतो. पण त्याबद्दल कोणाशीही बोलायला तो कचरतो. यासाठी लोक आपली खिल्ली उडवू शकतात, असे त्यांना वाटते. पण या फॅशनच्या युगात त्वचेची काळजी आणि मेकअप करणं हे फक्त मुलींपुरतं मर्यादित नसते. मॉडेल्स असो किंवा ब्लॉगर्स, प्रत्येकाच्या आयुष्यात त्वचेची काळजी आणि मेकअप विशेष भूमिका असते. म्हणूनच तुम्ही हे बिनधास्त करा आणि त्याबद्दल खुलेपणाने बोला.

स्थानिक फॅशन (Local fashion)स्टोअरमध्ये खरेदी

बहुतेक मुलांना स्थानिक फॅशन स्टोअरमधून (Local fashion)खरेदी करायला लाज वाटते. यामुळे त्यांची छाप खराब होईल आणि लोक त्यांना कमी लेखतील असे त्यांना वाटते. असे नसले तरी, काहीवेळा प्रसिद्ध ब्रँडच्या गोष्टी देखील स्थानिक ब्रँडच्या गोष्टींप्रमाणे छाप पाडत नाहीत. जेव्हा तुम्हाला एखादी चांगली आणि फॅशनेबल गोष्ट कमी किमतीत सहज मिळते आणि त्याचा तुमच्या खिशावर फारसा परिणाम होत नाही. यासाठी तुम्हाला अजिबात लाजण्याची गरज नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.